थंडीचा कडाका; माउंट अबू पाच अंशांवर 

पीटीआय
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

जयपूर : राजस्थानमध्ये थंडीचा कडाका कायम असून, माउंट अबू हे आजचे सर्वांत जास्त थंड ठिकाण ठरले. येथे किमान तापमान पाच अंश नोंदविले गेले.

दरम्यान, दाट धुक्‍यामुळे येथील रेल्वेसेवा विस्कळित झाली असून, 12 गाड्या विलंबाने धावत आहेत, तर तीन गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. माउंट अबूनंतर श्रीगंगानगर येथे किमान तापमान 6.2 अंश सेल्सिअस नोंदविले गेल्याची माहिती हवामान खात्याच्या विभागाने दिली. राज्याच्या अल्वर, पिलानी, फलोडी, चुरू येथे अनुक्रमे 8, 8.1, 8.4, 9.2 अंश तापमानाची नोंद झाली. वनस्थळी येथे 10.8, तर बुंदी आणि चित्तोरगड येथे 11 अंश तापमान होते. 

धुक्‍यामुळे रेल्वेसेवा विस्कळित 
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आज सकाळी दाट धुक्‍यामुळे रेल्वेसेवा विस्कळित झाली होती. तापमानाचा पाराही खाली आला होता. दिल्लीहून सुटणाऱ्या 35 गाड्या विलंबाने धावत होत्या, तर 13 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला, तर दोन गाड्या रद्द करण्यात आल्या. रेल्वेसेवेवर परिणाम झाला असला तरी विमानसेवा ही पूर्ववत सुरू होती. आज तापमानाचा पारा 8.6 अंश नोंदविण्यात आला, तर काल तो 9.4 अंश होता. आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्‍यता असून, कमाल तापमान 22 अंशांच्या आसपास राहील, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. 

लडाख, काश्‍मीर खोऱ्यात तापमानात सुधारणा 
श्रीनगर : लडाख आणि काश्‍मीरच्या उंचीवरील भाग सोडला तर अन्य भागांत रात्रीच्या तापमानात थोडीशी वाढ झाली होती. आगामी तीन दिवस यांच्याप्रमाणे हवामान राहण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 

आगामी 24 तासांत उंचावरील ठिकाणी तुरळक पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्‍यता असून, 4 आणि 5 फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणात पावसाची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. काश्‍मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी गोठणबिंदूच्या वरती तापमान होते. मात्र, उंचावरील भागात गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली होती, तेथे वातावरणात आता सुधारणा झाली आहे. 

लडाख प्रदेशातील लेह येथे उणे 11.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. दरम्यान, काल रात्री येथे उणे 13 .1 अंश तापमान नोंदविले गेले. त्यामुळे राज्यातील सर्वांत थंड ठिकाण म्हणून त्याची नोंद झाली. लेहनंतर कारगिलमध्ये रात्रीचे तापमान सर्वांत कमी म्हणजे उणे 10.4 अंश नोंदविले गेले, अशी माहिती हवामान खात्याच्या प्रवक्‍त्याने दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cold wave in Rajasthan; Winter India Indian railway