'कमांडर-इन-थीफ'वरील मानहानी खटला; राहुल गांधींची मुंबई हायकोर्टात धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

'कमांडर-इन-थीफ'वरील मानहानी खटला; राहुल गांधींची मुंबई हायकोर्टात धाव

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याचा ठपका ठेवत काँग्रेस नेते राहुल गांधींवर अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यातीलच एका खटल्यासंदर्भात आता राहुल गांधींनी आपल्या बचावासाठी आज बुधवारी मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे. राहुल गांधींनी केलेल्या 'कमांडर-इन-थीफ'च्या वक्तव्यावरुन हा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: 30 दिवसांत हजर न झाल्यास संपत्ती जप्त? परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ

राहुल गांधींनी त्यावेळी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात महाराष्ट्रातील एका भाजप समर्थकाने राहुल गांधींच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. याचिकाकर्ता महेश श्रीश्रीमाल यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटलंय की, राहुल गांधींनी 2018 मध्ये राफेल विमान व्यवहारावरुन पंतप्रधान मोदींवर टीकास्त्रा डागलं होतं. मात्र, त्यावेळी केलेलं वक्तव्य आक्षेपार्ह होतं.

या याचिकेनंतर मुंबईतील एका न्यायालयाने ऑक्टोबर 2019 मध्ये राहुल गांधींना समन्स जारी केला होता. मात्र, त्यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी न्यायालयासमोर हजर झालेले नव्हते. आता मानहानीच्या या खटल्याला निपटण्यासाठी आणि तो निरस्त करण्यासाठी राहुल गांधींचे वकील कुशल मोर यांनी मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश एस के शिंदे यांच्यासमोर अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये म्हटलंय की, ती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात करण्यात आली होती. याचिकाकर्त्याचा या सगळ्याशी काहीच संबंध नाही.

हेही वाचा: परमबीर सिंग फरार घोषित, न्यायालयाचा मोठा निर्णय

मात्र, दुसरीकडे श्रीश्रीमाल यांचं म्हणणं आहे की, पंतप्रधानांच्या समर्थकांना या वक्तव्यामुळे ठेच पोहोचली आहे. त्यांनी दावा केलाय की, राहुल गांधींनी केवळ पंतप्रधानांची नव्हे तर भाजपच्या सर्व सदस्यांना बदनाम केलंय. त्यांच्या या याचिकेवर हायकोर्ट 22 नोव्हेंबर रोजी सुनावणी करणार आहे.

केंद्रावर साधला निशाणा

तर दुसरीकडे राहुल गांधींनी पुन्हा एकदा केंद्रावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलंय की, पंतप्रधानांनी आपल्या मित्रांसाठी आता आणखी संपत्ती नव्हे तर सामान्यांसाठी योग्य नीती तयार केली पाहिजे.

loading image
go to top