आता किराणा दुकानातही मिळणार सर्दी-खोकल्याची औषधे, केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

Common Drugs Like Cold Fever Be Available In Grocery Stores: केंद्र सरकार काही औषधांचा ओटीसी श्रेणीत समावेश करण्याची तयारी करत आहे. यानंतर, ही औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय किराणा दुकानात देखील विकली जाऊ शकतात.
Common Drugs Like Cold Fever Be Available In Grocery Stores
Common Drugs Like Cold Fever Be Available In Grocery StoresEsakal

केंद्र सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सर्दी, खोकला, ताप यासाठी वापरण्यात येणारी औषधे आता किराणा दुकानातही विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. केंद्र सरकार ओटीसी अर्थात ओव्हर द काउंटर औषधांसाठी धोरण आणण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यावर विचार सुरू आहे.(Common Drugs Like Cold Fever Be Available In Grocery Stores )

OTC धोरण काय आहे?

ओटीसी म्हणजे ओव्हर द काउंटर म्हणजे अशी औषधे जी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकली जाऊ शकतात. अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये हे धोरण आधीपासूनच लागू करण्यात आलेले आहे. आता भारतात त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू झाली आहे. या दिशेने ही समिती काम करत आहे. या समितीने आतापर्यंत अनेक सूचना केल्या आहेत.

Common Drugs Like Cold Fever Be Available In Grocery Stores
VVPAT: स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी कोणती पावले उचलली? निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचा सवाल

हे धोरण का आणले जात आहे?

अहवालानुसार, ग्रामीण भागाला डोळ्यासमोर ठेवून सरकार हे धोरण आणण्याची तयारी करत आहे. ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता आहे. याशिवाय ग्रामीण भागात मेडिकल स्टोअर्सही देखील कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. अशा स्थितीत अनेक वेळा लोकांना आवश्यक औषधेही मिळत नाहीत. अनेक प्रकरणांमध्ये आवश्यक औषधे वेळेवर न मिळाल्याने रुग्णांची स्थिती अधिकच गंभीर होते. यासाठी समितीने ओटीसीबाबत सूचना दिल्या आहेत.

Common Drugs Like Cold Fever Be Available In Grocery Stores
भगव्या कपड्यातल्या जमावाकडून मदर तेरेसा शाळेची तोडफोड, शिक्षकांना मारहाण; जाणून घ्या प्रकरण?

कधी बनवण्यात आली समिती?

या वर्षी फेब्रुवारीमध्ये आरोग्य सेवा महासंचालक अतुल गोयल यांनी यासंबधीची तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती. या समितीकडे भारताचे ओटीसी औषध धोरण तयार करण्याचे काम सोपवण्यात आले होते. त्याबाबतचा मसुदाही समितीने सादर केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दुकानाच विकल्या जाणाऱ्या औषधांची यादीही देण्यात आली आहे. भारतात अद्याप असा कोणताही नियम नाही.

जर एखादे औषध केवळ प्रिस्क्रिप्शनसाठी सांगितले जात नसेल तर ते ओटीसी मानले जाते, जरी यासंबंधी कोणताही निश्चित नियम नाही. याला नियमांच्या कक्षेत आणून अत्यावश्यक औषधांची उपलब्धता वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Common Drugs Like Cold Fever Be Available In Grocery Stores
Work On Voting Day: मतदानाच्या दिवशी डिलिव्हरी बॉईजना सुट्टी नाही; फ्लिपकार्ट, टाटा अन् बिग बास्केटविरोधात तक्रार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com