रामनवमीला चार राज्यांत हिंसाचार, गुजरातमध्ये एकाचा मृत्यू

Communal violence RamNavami
Communal violence RamNavamie sakal

नवी दिल्ली : रामनवमीच्या (Ramnavami) दिवशी देशातील चार राज्यात हिंसाचार (Communal Violence) उफाळून आला. रामनवमीनिमित्त मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. त्यामध्येच हा हिंसाचार झाला आहे. गुजरात (Gujrat), मध्य प्रदेश (Madhya Pradesh), झारखंड (Jharkhand), पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) रामनवमीच्या मिरवणुकांमध्ये दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.

Communal violence RamNavami
मुंबईत रामनवमीच्या मिरवणुकीत वाद, दोन जखमी

मध्य प्रदेशात हिंसाचारानंतर संचारबंदी लागू -

मध्य प्रदेशातील खरगोन शहरात रविवारी रामनवमीच्या मिरवणुकीत हिंसाचार उसळल्यानंतर शहरातील तीन भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मिरवणुकीदरम्यान हल्लेखोरांकडून दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या असून काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. या घटनेनंतर प्रशासनाने शहरातील तीन भागात संचारबंदी लागू केली आहे, तर संपूर्ण शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या.

खरगोनचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी सुमेरसिंग मुजल्दे यांनी सांगितले की, रामनवमीची मिरवणूक जिल्हा मुख्यालयात असलेल्या तालाब चौकात काढताच काही समाजकंटकांनी मिरवणुकीत सामील असलेल्या लोकांवर दगडफेक केली. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडे फोडल्याचे त्यांनी सांगितले. समाजकंटक वाहनांना आग लावताना व्हिडिओंमध्ये दिसत आहेत. तसेच या व्हिडिओमध्ये दगडफेक आणि पोलिस लाठीचार्ज करत असल्याचेही दिसून येते. या हिंसाचारात पोलिस अधीक्षक सिद्धार्थ चौधरी यांच्यासह अनेक पोलिस जखमी झाले आहेत. खरगोनमध्ये चार घरांना आग लावण्यात आली आणि एका मंदिराचीही तोडफोड करण्यात आली.

गुजरातमध्ये एकाचा मृत्यू -

गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील खंभात आणि साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगरमध्ये रामनवमीच्या दिवशीही हिंसाचार उफाळून आला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला. खंभातचे पोलिस अधीक्षक अजित राजन म्हणाले, "रामनवमीच्या मिरवणुकीत ज्या ठिकाणी दोन गटात हाणामारी झाली त्या ठिकाणाहून एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. मृताचे वय अंदाजे 65 वर्षे आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दुसरीकडे, साबरकांठा येथील हिम्मतनगरमध्ये मिरवणुकीत जमावाने काही वाहने आणि दुकानांची तोडफोड केली. तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला.

बंगालमध्ये हिंसाचार -

पश्चिम बंगालमधील हावडा येथील शिबपूर भागात रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान हाणामारी झाल्याचीही बातमी आहे. हिंसाचारानंतर तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. शांतता राखण्यासाठी पावले उचलत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. बंगालमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीवर पोलिसांनी हल्ला केल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपने केला आहे. रामनवमीच्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्यांवर पोलिस कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. पोलिसांनी हावडा येथील रहिवाशांना सोशल मीडियावर काहीही पोस्ट करताना संयम बाळगण्याची विनंती केली आहे आणि कोणत्याही खोट्या बातम्या पसरू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे.

झारखंडमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक -

झारखंडमधील लोहरदगा येथील रामनवमीच्या मिरवणुकांवर दगडफेक आणि जाळपोळ झाली आहे. यात अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. शहरात शांतता राखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com