
टोकाचे विरोधक एकत्र; कम्युनिस्ट पार्टीचे चेअरमन अन् भाजप अध्यक्षांची भेट
दिल्ली : नेपाळ कम्युनिस्ट पार्टी (माओवादी-केंद्र) चे अध्यक्ष आणि नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात त्यांनी भेट घेतली असून यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेही उपस्थित होते. दोन टोकाचे विरोधक एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
(Communist Party Chairmen And Nepal's Former Minister Meet BJP President JP Nadda)
प्रचंड हे दोन वेळा नेपाळचे पंतप्रधान राहिले आहेत. ते दोन दिवसापासून भारतात आले आहेत. भाजपने त्यांना आमंत्रित केले असल्याची माहिती आहे. 'बीजेपी को जानो' या मोहिमेचा भाग म्हणून त्यांनी आज भाजपच्या मुख्यालयाला भेट दिली असल्याची माहिती आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे.
दरम्यान, चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीच्या आंतरराष्ट्रीय संपर्क विभागाचे प्रमुख लियू जियानचाओ यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय चीनी शिष्टमंडळाने कम्युनिस्ट पक्षाच्या विविध नेत्यांची भेट घेतली आणि त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. यावेळी प्रचंड यांचीही भेट चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली होती.
Web Title: Communist Party Chairmen And Nepals Former Minister Meet Bjp President Jp Nadda
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..