esakal | मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करत भाजपकडून पुस्तकाचे प्रकाशन
sakal

बोलून बातमी शोधा

compare narendra modi to shivaji maharaj BJP releases book

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत भारतीय जनता पक्षाने आज (ता.१२) आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करत भाजपकडून पुस्तकाचे प्रकाशन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत भारतीय जनता पक्षाने आज (ता.१२) आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नरेंद्र मोदी आजचे शिवाजी महाराज आहेत, असा आशय या पुस्तकात दिला असल्याचे बोलले जात आहे. आज (ता.१२) दिल्ली येथील भाजप कार्यालयात प्रकाशन करण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. जगाच्या अंतापर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणार नाहीत. "आज के शिवाजी नरेंद्र मोदी" हे मनाला पटत नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

मोदी यांची तुलना थेट शिवाजी महाराजांसोबत करण्यात आल्याने सर्वच स्तरातून टीका होत आहे. पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर भाजप नेते भगवान गोयल यांनी आपल्या फेसबुक व ट्वीटर खात्यावरून पोस्ट करत ही माहिती दिली आहे. भाजपकडून प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाला मात्र सोशल मिडियावरून विरोध होत असल्याचे दिसत आहे. मोदींची तुलना शिवाजी महाराजांबरोबर करणे चुकीचे असल्याचे नेटीझन्सचे म्हणणे असून महाराष्ट्रासह देशात यावरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे.