Bhagwant Mann | दारू पिऊन गुरुद्वारेत प्रवेश; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

complaint against Punjab cm Bhagwant Mann for entering gurudwara after getting drunk

दारू पिऊन गुरुद्वारेत प्रवेश; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार

चंदीगड: भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी शनिवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्याविरोधात पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली. सीएम मान यांच्यावर मद्यधुंद अवस्थेत गुरुद्वारामध्ये प्रवेश केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी पंजाबच्या पोलिस महासंचालकांना त्यांच्या तक्रारीवर कारवाई करण्याची विनंती केली.

भाजप नेत्याने ट्विटरवर तक्रारीचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि म्हटले, "पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या विरोधात मद्यधुंद अवस्थेत गुरुद्वारा दमदमा साहिबमध्ये प्रवेश केल्याबद्दल पोलिस तक्रार दाखल केली आहे. मी डीजीपी पंजाब आणि राज्य पोलिसांना माझ्या तक्रारीवर कारवाई करण्याची विनंती करतो.

हेही वाचा: चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार? जितेंद्र आव्हाड म्हणाले, परत..

याआधी शुक्रवारी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एसजीपीसी) पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते भगवंत सिंग मान यांनी देशभरात 14 एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या बैसाखीच्या मुहूर्तावर मद्यधुंद अवस्थेत तख्त दमदमा साहिबमध्ये प्रवेश केल्याचा आरोप केला होता. त्यासाठी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणीही समितीने केली होती.

हेही वाचा: 'छेडोगे तो छोडेंगे नही'; भोंगे हटवण्यावरून PIF संघटनेचा मनसेला इशारा

टॅग्स :PunjabaapBhagwant Mann