म्हैस दूध देईना; मालकाची थेट पोलिसांत तक्रार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हैस दूध देईना; मालकाची थेट पोलिसांत तक्रार!

म्हैस दूध देईना; मालकाची थेट पोलिसांत तक्रार!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात एक विचित्र प्रकरण पोलिसांसमोर आले आहे. आपली म्हैस दूध काढून देत नाही, म्हणून एका व्यक्तीने म्हशीसह थेट पोलिस स्टेशन गाठलं आणि म्हशीविरोधात तक्रार करत आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा अशी मागणी पोलिसांकडे केली. त्याची तक्रार ऐकून पोलिसही हैराण झाले. नंतर या रंजक प्रकरणाची उकलही पोलिसांनी रंजक पद्धतीनेच केली .

हेही वाचा: Photos : पाहा, कार्तिकीसाठी पंढरीत भरली भक्तांची मांदियाळी!

४५ वर्षीय छोटेलाल यादव उर्फ बाबूराम असं तक्रार करणाऱ्या इसमाचं नाव असून तो मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यातील नयागावचा रहिवाशी आहे. आपली म्हैस दूध देत नाही म्हणून त्यानं थेट नयापूर पोलिस स्टेशन गाठलं आणि म्हशीविरुद्ध तक्रार केली. तसा लेखी अर्जही त्यानं दिला. त्याची ही तक्रार ऐकून सुरुवातीला पोलिसही अचंबित झाले, परंतू नंतर त्यांनी बाबुरामला समजावून घरी पाठवले.

पण, थोड्या वेळाने तो पुन्हा पोलिस स्टेशनला आला; पण यावेळी त्यानं त्याची म्हैसही सोबत आणली आणि पोलिस स्टेशनबाहेर बांधली. आता त्याने पोलिसांना म्हशीचे दूध काढण्यास मदत करण्यास सांगितले. हे पाहून नयागाव पोलिस ठाण्याच्या पोलिसांनाही हे प्रकरण इतके सोपे नसल्याचे समजले.

loading image
go to top