
रिपलिंग कंपनीचे संस्थापक प्रसन्ना शंकर यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत पत्नी दिव्यावर गंभीर आरोप केले आहेत. पत्नी आणि चेन्नई पोलीस आपल्याला त्रास देत असल्याचं प्रसन्न शंकरने म्हटलंय. रविवारी सायंकाळी प्रसन्न शंकरने म्हटलं की, मी घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जात आहे. सध्या चेन्नई पोलिसांपासून लपून तामिळनाडुच्या बाहेर आहे. प्रसन्न सिंगापूर बेस्ड क्रिप्टो सोशल नेटवर्क कंपनीचा संस्थापक आहे. त्याने रिपलिंग नावाचीही कंपनी स्थापन केलीय. त्या कंपनीची व्हॅल्यू जवळपास ८० ते ९० कोटी रुपये इतकी आहे.