दिल्लीत जानेवारीत सायबर हिंसेवरील परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायबर हिंसेवरील परिषद

दिल्लीत जानेवारीत सायबर हिंसेवरील परिषद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिल्ली : महिला व मुलांवरील सायबर हिंसेमुळे त्यांच्या सायबर अधिकारांचे उल्लंघन होत आहे. सायबर हिंसेविरुद्ध आम्ही ठामपणे उभे असून प्रत्येकाला सुरक्षित वाटणे महत्वाचे आहे. सर्व प्रकारच्या हिंसेपासून नेटिझन्सचे रक्षण व्हायला हवे. त्यासाठी, पुढील वर्षी जानेवारीत सायबर मानसशास्त्रावरील सहावी राष्ट्रीय वार्षिक परिषद आयोजित करण्यात आली आहे. महिला आणि मुलांसाठी सुरक्षित भारत घडविण्यासाठी ‘सायबर हिंसेविरुद्ध भारताचा लढा’ या विषयावर ही परिषद होईल.

रिसपॉन्सिबल सिटीझम या सामाजिक संस्थेने सायबर पीस फाउंडेशनच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेच्या निमित्ताने सायबर हिंसेविरुद्ध भारताचा लढा या मोहिमेचेही खासदार विनय सहस्त्रबुद्धे, राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुनगो, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. आयसीसीआरच्या दिल्लीतील सभागृहात हा कार्यक्रम झाला.

हेही वाचा: राज्य सहकारी बँक म्हणजे शक्तिकेंद्र; शरद पवार

यावेळी सहस्त्रबुद्धे यांनी संशोधन, सुधारणा आणि पुर्नमांडणीवर भर दिला. सायबर हिंसेंसंदर्भात सर्वसमावेशक संशोधनाची गरज आहे. पुराव्यावर आधारित संशोधनामुळे हस्तक्षेपाच्या धोरणात सुधारणा करण्यासाठी मदत होईल. त्यातून, सायबर जगतात महिला व मुलांच्या रक्षण करण्यासाठी सध्याच्या रचनेची पुर्नमांडणी करता येईल, असे ते म्हणाले.

loading image
go to top