राज्य सहकारी बँक म्हणजे शक्तिकेंद्र; शरद पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

राज्य सहकारी बँक म्हणजे शक्तिकेंद्र; शरद पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे. ही बँक सुदृढ होणे म्हणजेच राज्यातील सहकार सुदृढ होणे आहे. राज्यातील शेवटच्या माणसाला स्वबळावर उभे करण्यासाठी एक शक्तीकेंद्र म्हणून बँक काम करत आहे, असे गौरोवोद्‌गार माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे काढले.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा शतकोत्तर दशकपूर्ती (११० वर्ष) सोहळा आज शरद पवार, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी पवार बोलत होते.

हेही वाचा: पाकमुळे अडलेला भारताचा गहू अफगाणकडे जाणार? खान म्हणतात, 'माणुसकीने विचार केला तर...'

या सोहळ्याला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश, खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यातील जिल्हा बँकांचे अध्यक्ष उपस्थित होते. या कार्यक्रमात बँकेच्या उभारणीत योगदान दिलेल्या सहकार धुरिणांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.

पवार म्हणाले, की राज्यातील सहकार क्षेत्राला उभारी देण्यासाठी या राज्य सहकारी बँकेने मोठे योगदान दिले आहे. बँकेचा ११ दशकांचा प्रवास हा महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचे पान आहे.

हेही वाचा: राज्यसभा सरचिटणीसपद पी. सी. मोदी यांच्याकडे

वैकुंठभाई मेहता, विठठ्लदास ठाकरसी, धनंजय गाडगीळ या बँकिंग क्षेत्राशी बांधिलकी असणारे आणि या क्षेत्रातील कर्तृत्ववान अशा या व्यक्ती आहेत. त्यांचे सहकार क्षेत्रात योगदान आहे. अनेक संस्था या बँकेमार्फत राज्यात उभ्या राहिल्या आहेत.

'सहकार चळवळीला नवीन दृष्टीकोन देण्याची गरज आहे. वैशिष्ट्ये जोपासून काळानुरुप बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी उपलब्ध ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यास महाराष्ट्र आणि देशाचे रुप पालटेल.'

-नितीन गडकरी, केंद्रीय परिवहन मंत्री

loading image
go to top