esakal | इंडियन आर्मीची गोपनिय माहिती ISIला पुरवली; दोन जवानांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Representational Image of Indian Army

इंडियन आर्मीची गोपनिय माहिती ISIला पुरवली; दोन जवानांना अटक

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल अशी संवदेनशील आणि गोपनिय माहिती पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI ला पुरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पंजाब पोलिसांनी या दोन्ही जवानांना अटक केली आहे. (confidential info of Indian Army gives to ISI two army personnel arrested)

या जवानांवर हेरगिरी करत लष्कराची महत्वाची माहिती ISIला लीक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या दोघांकडून लष्कराची कार्यपद्धती आणि तैनातीबाबतची काही महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या दोन जवानांनी सुमारे ९०० क्लासिफाईड कागदपत्रं ISIच्या एजंट्सना पुरवल्याचं पंजाबच्या पोलीस महासंचालकांनी सांगितलं.

हेही वाचा: काल जे घडलं ते महाराष्ट्राच्या परंपरेला लाजवणारं - उद्धव ठाकरे

टाईम्सनाऊच्या वृत्तानुसार, हरप्रीत सिंग (वय २३) आणि गुरभेज सिंग (वय २३) अशी अटक करण्यात आलेल्या दोन जवानांची नावं आहेत. यांपैकी परप्रीत हा सन २०१७ मध्ये लष्करात १९ राष्ट्रीय रायफल्समध्ये भरती झाला होता. तर गुरभेज हा कालगिलमध्ये १८ सिख लाईट इन्फट्रीत क्लार्क म्हणून कार्यरत होता. तो २०१५मध्ये लष्करात भरती झाला होता.

हेही वाचा: "भास्कर जाधवांनी सांगितलं त्यापेक्षा खूप काही सभागृहात घडलं"

पंजाबचे पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता म्हणाले, "दोघाही आरोपी जवानांनी लष्कारासंबंधीचे फोटो आणि सुमारे ९०० क्लासिफाईड कागदपत्रं पाकिस्तानातील ड्रग स्मगलर रणवीर सिंह याला गेल्या चार महिन्यांमध्ये पुरवली आहेत. ही कागदपत्रे पुढे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISIला हस्तांतरित करण्यात आली.

loading image