भारतीय जनता पक्षामधील विसंवाद चव्हाट्यावर

पीटीआय
सोमवार, 30 डिसेंबर 2019

‘एनआरसी भारताची अंतर्गत बाब’
नवी दिल्ली : राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिकेची निर्मिती (एनआरसी) ही पूर्णपणे भारताची अंतर्गत बाब असून, दोन्ही देशांच्या सीमा सुरक्षा दलांमधील सहकार्य हे अत्यंत चांगले असल्याचे मत बॉर्डर गार्डस बांगलादेशचे (बीजीबी) प्रमुख महासंचालक मेजर जनरल शाफीनूल इस्लाम यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले. सध्या भारत दौऱ्यावर असलेल्या इस्लाम यांनी उभय देशांची सुरक्षा दले सीमावर्ती भागांतून होणारी बेकायदा घुसखोरी रोखण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नमूद केले. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांच्या सुरक्षा दलांत महासंचालकस्तरीय चर्चेसाठी ‘बीजीबी’चे हे शिष्टमंडळ भारत भेटीवर आले आहे. आज या चर्चासत्राचा शेवटचा दिवस होता. सुरक्षा दलांच्या या बैठकीमध्ये सीमावर्ती भागातील तस्करी, गुन्हेगारी कारवाया आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

लखनौ - उत्तर प्रदेशातील नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान एका पोलिस अधिकाऱ्याने अल्पसंख्याक समुदायाबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून भाजपमध्ये आता दोन गट पडले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हे वक्तव्य करणारे मेरठ शहराचे पोलिस निरीक्षक अखिलेश नारायणसिंह यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी भाजपचे वरिष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मात्र त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. संबंधित पोलिस अधिकाऱ्याचे वक्तव्य हे सर्व मुस्लिम समुदायाबाबत नव्हते, असे मौर्य यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस अधिकारी अखिलेश नारायणसिंह यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये त्यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात काळ्या पिवळ्या पट्या बांधून आंदोलन करणाऱ्यांनी पाकिस्तानमध्ये निघून जावे, असे वक्तव्य केले होते. 

राष्ट्रवादीच्या आमदाराला मोठा झटका; कारखान्याचे संचालकपद रद्द

दरम्यान, बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनीही पोलिस अधिकाऱ्याच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे, उत्तर प्रदेशप्रमाणेच देशभर मुस्लिम समाजाचे वास्तव्य असून, हे सगळे भारतीय आहेत, पाकिस्तानी नाहीत. यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्याने अशाप्रकारचे वक्तव्य करणे हे दुर्दैवी आहे. अशाप्रकारच्या पोलिस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी केली जावी आणि त्यात दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे मायावती यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश सरकारच्या प्रवक्‍त्याने मात्र पोलिस अधिकाऱ्याच्या या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

कॉलेजच्या रुटीन चेकअपमध्ये तीन विद्यार्थीनी आढळल्या गरोदर

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी-पुस्तिका (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (एनपीआर) यांसारख्या मुद्द्यांवर राष्ट्रीय पातळीवर विचारमंथन होणे गरजेचे आहे. याविरोधात आंदोलन करण्याऐवजी लोकांनी केंद्र सरकारला सूचना कराव्यात.
- वेंकय्या नायडू, उपराष्ट्रपती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Conflict in bjp politics