कॉलेजच्या रुटीन चेकअपमध्ये तीन विद्यार्थीनी आढळल्या गरोदर

वृत्तसेवा
रविवार, 29 डिसेंबर 2019

  • कॉलेजमधील तीन विद्यार्थी गरोदर
  • हैदराबादमधील कॉलेजमधला प्रकार
  • विद्यार्थ्यांची नियमित वैद्यकीय चाचणीत उघडकीस
  • घटनेने हैद्राबादमध्ये खळबळ

हैद्राबाद : येथील एका सरकारी कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थी गरोदर असल्याचं समोर आलं आहे. हैदराबादमधील एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची नियमित वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. या वैद्यकीय तपासणीत कॉलेजमधील तीन विद्यार्थीनी गरोदर असल्याचं उघडकीस आलं आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस आणखी उघडकीस येत असताना आता हैदराबादमध्ये घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या तिन्ही विद्यार्थींनींवर बलात्कार करण्यात आला असल्याचा आरोप काहींकडून करण्यात येत आहे. बलात्कारल झाल्यानंतर या गरोदर झाल्या असल्याचे म्हटले जात आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नुकतेच कॉलेजच्या १० विद्यार्थीनींचं रूटीन चेकअप करण्यात आलं. यामध्ये तीन विद्यार्थीनी गरोदर असल्याचं उघड झालं आहे. या तिन्ही विद्यार्थीनींवर काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचार करण्यात आला असावा असा अंदाज अधिकाऱ्यांनी बांधला असून पुढील तपासण्या चालू आहेत.

राष्ट्रवादीच्या आमदाराला मोठा झटका; कारखान्याचे संचालकपद रद्द

घराजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीने या तीन मुलींचे लैंगिक शोषण केलं असल्याची माहिती प्राथमिक तपासात या मुलींनी दिली आहे. कॉलेज प्रशासनाने अद्याप आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केलेली नाही. काही संघटनांकडून मात्र, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी फिक्स; मित्रपक्षाला आपल्या कोट्यातून मंत्रिपद

तत्पूर्वी, गरोदर असलेल्या तीन विद्यार्थीनींपैकी दोन विद्यार्थीनी या बीएससीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहेत. तर, तिसरी मुलगी बीएससीच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थीनी आहे. आरोपी नेमका कोण आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: college girl pregnant found in routine health check up in hyderabad