कर्नाटक विजयानंतर आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे निरक्षक ठरले; महाराष्ट्रातून...

 congress rahul gandhi
congress rahul gandhi esakal

नवी दिल्ली - आगामी काळात पाच राज्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कामाला लागले आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसने कर्नाटकमध्ये जबरदस्त विजय मिळवला. त्यानंतर काँग्रेसचा उत्साह वाढला आहे.

 congress rahul gandhi
Jaipur-Mumbai Express Firing : ...अन् आरपीएफचे टिकाराम मीना यांचे 'ते' स्वप्न अधुरेच राहिले

या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम येथील नियुक्ती जाहीर झाल्या आहेत.

मध्यप्रदेशच्या निरीक्षकपदी महाराष्ट्रातील चंद्रकांत हांडोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीतील पराभवानंतर हंडोरे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

 congress rahul gandhi
Sambhaji Bhide : संभाजी भिडेंची चौकशी होणार; पोलिस आयुक्त म्हणतात...

राजस्थानच्या वरिष्ठ निरीक्षकपदी मधुसूदन मिस्त्री, तर निरीक्षकपदी शशिकांत सेंथील, मध्ये प्रदेशच्या वरिष्ठ निरीक्षपदी रणदीप सुरजेवाला, छत्तीसगढच्या वरिष्ठ निरीक्षकपदी प्रितम सिंग आणि निरीक्षकपदी मीनाक्षी नटराजन तसेच तेलंगनाच्या वरिष्ठ निरीक्षपदी दीपा दसमुशी यांची तर निरीक्षकपदी डॉ. श्रीवेल्ला प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली. तर मिझोरमच्या निरीक्षकपदाची जबाबदारी सचिन राव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com