Congress Bank Ac Frozen: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसची बँक खाती गोठवली? काँग्रेसचा सरकारवर गंभीर आरोप

कुठल्याही प्रकारी बिलं आणि कर्मचाऱ्यांचे पगारही देता येत नसल्याचं अजय माकन यांनी म्हटलं आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi

Congress Bank Frozen : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसला मोठा झटका देणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेससह युथ काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. (congress bank accounts was frozen just before lok sabha elections congress alleged on modi govt)

काँग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर गंभीर आरोप केला. त्यांनी म्हटलं, सध्याच्या घडीला आमच्याकडं खर्चासाठी पैसा नाही. आम्हाला कुठलीही बिलं भरता येत नाहीएत, तसेच आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार देता येत नाहीएत. सगळ्याचं गोष्टींवर परिणाम झाला आहे. केवळ भारत जोडो न्याय यात्राच नव्हे तर आमच्या सर्वच राजकीय कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com