नौदलाचे माजी प्रमुख ‘भारत जोडो’ पदयात्रेत

राहुल गांधी यांनी लुटला लोकनृत्याचा आनंद
Congress Bharat Jodo Yatra
Congress Bharat Jodo Yatra

हैदराबाद : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला सर्वस्तरांतून मोठा पाठिंबा मिळू लागला असून नौदलाचे माजी प्रमुख अॅडमिरल एल. रामदास हे देखील आज या यात्रेमध्ये सहभागी झाले होते. राहुल यांची ही यात्रा सध्या तेलंगणमध्ये आहे. या यात्रेला गुरुवारी सकाळी पतनचेरू शहराच्या बाहेरील भागातून सुरूवात झाली. रूद्रम येथे राहुल यांनी लहान मुलांना कराटे प्रशिक्षण दिले तसेच त्यांनी लोक नृत्याचाही आनंद लुटला. आज रात्रीला या यात्रेचा मुक्काम संगारेड्डी जिल्ह्यातील सिवामपेट येथे असेल अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘‘ अॅडमिरल रामदास (वय ८९) हे आजही जनतेच्या प्रश्नावर लढा देत असतात. पत्नी ललिता रामदास आणि मुलगी कतारी हे भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले होते.’’ आज सकाळच्या सत्रामध्ये तेलंगण काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार ए. रेवनाथ रेड्डी, खासदार एन. उत्तमकुमार रेड्डी आणि अन्य नेते राहुल यांच्यासोबत यात्रेमध्ये चालले. ही यात्रा उद्या (ता.४) ब्रेक घेणार आहे. भारत जोडो यात्रेचा तेलंगणमधील आजचा बारावा दिवस होता.

आसूडही मारून घेतले

आज राहुल यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. त्यांनी लहान मुलांना कराटे प्रशिक्षण दिले तसेच स्थानिकांसोबत ढिमसा नृत्यही केले. बोनालू उत्सवामध्ये भाग घेत त्यांनी स्वतःवर आसूड देखील मारून घेतले. तेलंगणमधील बोनालू उत्सवामध्ये पाठीवर आसूड मारून घेण्याची परंपरा आहे. पोतराज बनलेली व्यक्ती स्वतःच्या शरीरावर आसूड मारून घेते, पोतराज हा देवी महाकालीचा भाऊ म्हणून ओळखला जातो. देवीच्या रक्षणासाठी तो स्वतःच्या शरीरावर चाबकाचे फटके मारून घेतो. राहुल यांची भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये प्रवेश करेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com