esakal | मतमोजणीला दोन दिवस राहिले असताना उमेदवाराचे निधन!

बोलून बातमी शोधा

vv prakash
मतमोजणीला दोन दिवस राहिले असताना उमेदवाराचे निधन!
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

तिरुवअनंतपुरम- मल्लापुरम जिल्ह्यातील काँग्रेस कमिटी अध्यक्ष आणि युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) चे निलंबूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार व्ही. व्ही. प्रकाश यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाला आहे. ते 56 वर्षांचे होते. त्यांना रात्रीच्या सुमारास हृद्यविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचे सकाळी 5 च्या सुमारास निधन झाले. मतमोजणीला दोन दिवस शिल्लक राहिले असताना त्यांच्या मृत्यूने UDFच्या नेत्यांना धक्का बसला आहे. प्रकाश यांनी निलांबुरमधून लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटच्या Left Democratic Front (LDF) पी. व्ही. अनवर यांना चांगली टक्कर दिली होती.

हेही वाचा: लसीकरण केंद्र की कोरोना स्प्रेडर सेंटर? नागरिक तासन्‌तास रांगेतच

प्रकाश यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गेल्या काही दिवसांपासून हृदयासंबंधी आजार होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मल्लापुरमचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमि युडीएफ निलामबूरचे उमेदवार व्ही. व्ही. प्रकाश यांचे निधन एक अपघात आहे. ते एक प्रामाणिक आणि मेहनती काँग्रेस सदस्य म्हणून ओळखले जातील. ते नेहमीच लोकांच्या मदतीसाठी पुढे असायचे, असं राहुल गांधी म्हणाले.