गेहलोत यांच्या गदारोळानंतर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत 'हा' मराठी नेता आघाडीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul gandi  Amethi and Sonia gandhi Rae Bareli Will contest the election

गेहलोत यांच्या गदारोळानंतर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत 'हा' मराठी नेता आघाडीवर

नवी दिल्ली : राजस्थान काँग्रेसमधील गदारोळामुळे, पक्षाचे हायकमांड मुकुल वासनिक यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीत उमेदवार बनविण्याचा विचार करू शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुकुल वासनिक यांच्या नावाची घोषणा होण्यापूर्वी त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्नही सुरू झाले आहेत. मुकुल वासनिक हे काँग्रेसच्या G-23 नेत्यांच्या गटात आहेत, ज्यांनी पक्षातील मुख्य बदलांबाबत सोनिया गांधींना पत्र लिहिले होते. (Mukul Wasnik news in Marathi)

हेही वाचा: Economy of India: ...तर भारताची स्थिती श्रीलंकेसारखी होऊ शकते; AIBEA चा सूचक इशारा

विशेष म्हणजे या पदासाठी आघाडीचे मानले जाणारे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ही निवडणूक न लढवण्याची घोषणा केली असताना अध्यक्षपदासाठी मुकुल वासनिक यांचे नाव पुढे येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान काँग्रेसचे आमदार ज्या प्रकारे पक्ष हायकमांडच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून रविवारी विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपासून दूर राहिले, त्यामुळे गांधी कुटुंबाचा अपमान झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीसंदर्भात वासनिक यांनी एके अँटनी यांची यापूर्वीच भेट घेतली आहे. लवकरच ते अशोक गेहलोत यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. त्याचवेळी शशी थरूर आणि दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आपली नावे आधीच जाहीर केली आहेत. या निवडणुकीसाठी दोन्ही नेते शुक्रवारी आपले अर्जही भरू शकतात.

हेही वाचा: अपमानित करण्याचा हेतू नव्हता, पण...': कंडोम टिप्पणीवर आयएएस अधिकाऱ्याची सारवासारव

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी येत्या एक-दोन दिवसांत राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील. तत्पूर्वी अशोक गेहलोत यांनी सोनियांची भेट घेऊन जयपूरमध्ये काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक होऊ न शकल्याबद्दल माफी मागितली होती. तसेच यापुढे अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवाय आपण मुख्यमंत्रीपदी राहायचे की नाही याचा निर्णय सोनिया गांधी घेतील, असंही ते म्हणाले.