BJP on Congress : 'लव्ह जिहाद'मुळे काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीचा खून? पक्षाकडून मात्र 'लव्ह स्टोरी'चा एँगल

काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येप्रकरणात एबीव्हीपीने कॉलेजमध्ये आंदोलन केलं आणि न्यायाची मागणी केली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं की, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या घटनेत लव्ह जिहादचा एँगल आहे.
BJP on Congress
BJP on Congressesakal

Love Jihad News : कर्नाटकातल्या हुबळीमध्ये एका काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीचा खून झाल्यानंतर राजकारण तापलं आहे. कर्नाटकात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून लव्ह जिहाद होतोय, असा आरोप भाजपने केलाय. मात्र काँग्रेसने सदरील प्रकरणाला लव्ह स्टोरीचा एँगल दिलाय.

भाजपकडून सिद्धरामैय्या सरकारवर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. काँग्रेस ध्रूवीकरणाचं राजकारण करत असल्याचा भाजपचा आरोप आहे. काँग्रेस सरकार कायदा सुव्यवस्थेपुढे कॉम्प्रमाईज करत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. नगरसेवकाच्या मुलीचा मृत्यू लव्ह जिहादमुळे झाल्याचं भाजपचं म्हणणं आहे.

दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी म्हटलं की, मृत मुलगी आणि आरोपी फैयाज रिलेशनशीपमध्ये होते. नंतर ते वेगळे झाले होते. नेहाने दुसऱ्या कोणाशीतरी लग्न करणार असल्याचं सांगितल्यानंतर फैयाजने तिला चाकूने भोसकलं, अशी शक्यता आहे. या प्रकरणी अद्याप पूर्ण माहिती समोर आलेली नाही. दोघांचं म्युच्युअल रिलेशनशीप होतं, त्यामुळे याच्यात लव्ह जिहादचा एँगल नाही, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं.

BJP on Congress
Arvind Kejriwal Arrest : PM मोदींच्या इशाऱ्यावर केजरीवाल यांचा छळ; आपच्या खासदाराचा गंभीर आरोप

काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येप्रकरणात एबीव्हीपीने कॉलेजमध्ये आंदोलन केलं आणि न्यायाची मागणी केली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं की, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या घटनेत लव्ह जिहादचा एँगल आहे. मुलीने फैयाजची ऑफर नाकारली होती. काँग्रेस सरकारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नेमकी घटना काय?

कर्नाटकातल्या हुबळी येथील बीव्हीबी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काँग्रेस नगरसेवकाच्या २३ वर्षीय मुलीचा खून करण्यात आला. फैयाज नावाच्या मुलाने चाकूने भोसकून तिला ठार केलं. त्यानंतर तो फरार झाला आहे.

या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी म्हटलं की, फैयाज हा जुना विद्यार्थी होता. त्याने माझ्या मुलीला प्रपोज केलं होतं. परंतु तिने त्याचं प्रपोजल नाकारलं होतं. तिला फैयाज आवडत नव्हता, त्यामुळे ती या सगळ्यापासून दूर राहू इच्छित होती. म्हणूनच तिचा खून करण्यात आल्याचं मृत मुलीच्या नगरसेवक वडिलांनी सांगितलं.

BJP on Congress
KL Rahul IPL 2024 : विराटनं बळजबरीनं RCB चं कॉन्ट्रॅक्ट साईन करायला लावलं... केएल राहुल हे काय म्हणाला?

घटनेपूर्वी आरोपीसोबत माझं बोलणं झाल्याचंही मुलीच्या वडिलांनी सांगितलं. दोघे वेगवेगळ्या धर्माचे असल्याने मुलीनेही लग्नास नकार दिला होता, असं ते म्हणाले. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी भाजपवर आरोप केले असून केवळ भीतीचं वातावरण तयार केलं जात असल्याचं ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com