KL Rahul IPL 2024 : विराटनं बळजबरीनं RCB चं कॉन्ट्रॅक्ट साईन करायला लावलं... केएल राहुल हे काय म्हणाला?

KL Rahul
KL Rahul RCB Contract Virat Kohli IPL 2024Esakal
Updated on

KL Rahul RCB Contract Virat Kohli IPL 2024 : लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने कर्नाटकचा असूनही आरसीबीला सोडचिठ्ठी दिली आहे. केएल राहुलने आर. अश्विनच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आरसीबीचा करार कसा झाला होता याबद्दल खुलासा केला. संघ थांबलेल्या हॉटेलमध्ये केएल राहुलने आरसीबीसोबत करार केला होता. हा करार कोणामुळे पूर्णत्वास गेला हे देखील राहुलने सांगितले.

KL Rahul
Punjab Kings: 'सरकार उठा आता', MI विरुद्धच्या सामन्यात मराठी सिनेमांचे डायलॉग! पंजाब किंग्जने घातला X वर धुमाकूळ

केएल राहुल अश्विनच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, 'आयटीसी गार्डेनिया हॉटेलमध्ये विराट कोहली होता. कोच रे जेनिंग आणि इतर सपोर्ट स्टाफ देखील होता.. विराट कोहली त्यावेळी फक्त एवढंच म्हणाला होता की तूला आरसीबीकडून खेळायचं आहे का तू करारावर स्वाक्षरी करणार का? मी त्यावेळी त्याला म्हणालो की तू थट्टा करतोयस का? हे तर माझं स्वप्न आहे.

त्यानंतर विराट कोहली म्हणाला की मी गंमत करत होता. तुझ्याकडे कोणताही पर्याय नाही तूला करारावर स्वाक्षरी करावी लागेल. मी करारावर स्वाक्षरी केली त्यानंतर विराट म्हणाला की हा एक भन्नाट प्रवास असेल. पुढचे काही महिने तू खूप मजा करणार आहेस.'

KL Rahul
LSG vs CSK : लखनौने सीएसकेला दिला पराभवचा धक्का; 8 विकेट्सनी जिंकला सामना

केएल राहुलने आरसीबीसोबतच्या दोन महिन्याच्या कालावधीत खूप काही शिकल्याचं सांगितले. राहुल म्हणाला की, 'मला देखील बंगळुरूकडून खेळायचं होतं. मला ते आवडलं. मी तिथून सुरूवात केली. मला शेवट देखील तेथूनच करायचा होता. ते माझ्या डोक्यात होतं. मात्र आयपीएलचं एक सुंदर वैशिष्ट्य आहे की ते तुम्हाला वेगवेगळ्या संघाकडून आणि वेगवेगळ्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी देतं.'

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com