
नवी दिल्ली : कॅनडसह तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंसाचारग्रस्त मणिपूर मध्ये न जाण्यावरून काँग्रेस लक्ष्य केले आहे. मे २०२३ नंतर हा मोदींचा ३५ वा परदेश दौरा आहे. मणिपूरला जाऊन ते तेथील लोकांच्या वेदना, त्यांना होणारा त्रास याकडे बघतील काय? अशी विचारणा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे.