मोदी सरकारकडे धोरण नाही; कॉंग्रेसची टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 जून 2020

आता पाचव्यांदा लॉकडाउन वाढविला जात आहे.लॉकडाउनबद्दल सरकारचे धोरण काय, कोरोनाशी लढाईची नेमकी रणनिती काय,आर्थिक अरिष्टातून कसे बाहेर पडणार, याची उत्तरे सरकारने द्यावी, अशी मागणी सुरजेवाला यांनी केली.

नवी दिल्ली - लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय सरकारने घेतला असताना कॉग्रेसने लॉकडाउनवरून मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. कोणत्या मार्गाने पुढे जावे आणि कोणते धोरण असावे हे अद्याप सरकारला उमगलेले नाही, असा टोला कॉग्रेसने लगावला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कॉंग्रसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी सरकारवर हल्ला चढवताना सांगितले, की सरकार फक्त २८ लाख लोकांच्या मदतीचा आकडा सांगत आहे. परंतु देशात १२ कोटी स्थलांतरीत मजूर आहे आणि याचा तपशील सरकारकडे अजूनही नाही. मोफत अन्नधान्य वाटपाची घोषणा करणाऱ्या सरकारला अद्याप हेही माहिती नाही की १४ मे पर्यंत ७३ जण भूकबळी ठरले आहे. या स्थलांतरीत मजुरांसाठी पीएम केअर्स निधीतून किती रक्कम देण्यात आली, असा खोचक सवाल सिब्बल यांनी केला. लॉकडानउनच्या धोरणावरून सिब्बल यांनी सरकारची खिल्ली उडवली. फक्त चार तासांच्या सूचनेनंतर लॉकडाउन लागू करणाऱ्या सरकारकडे आता त्यातून बाहेर पडण्याचे धोरण नाही. त्यामुळे एकापाठोपाठ एक वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचना येत आहेत. आतापर्यंत सरकारचे धोरण विभाजनवादी राजकारणाचे होते. पण कोरोनाने ते बदलण्यास भाग पाडले. आता सरकारला कळत नाही देश कसा चालवावा. मोदी सरकारकडे संकटकाळात काम कसे करावे याचा अनुभव नसल्याचा टोलाही सिब्बल यांनी लगावला. 

आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आर्थिक संकटातून कसे बाहेर पडणार  
कांग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही उद्यापासून लॉकडाउनचा पाचवा टप्पा लागू होत असल्याचा चिमटा काढला. कधी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आतापर्यंत चारवेळा लॉकडाउन वाढविण्यात आला. आज एकाच दिवसात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ८३८० ने वाढली असून एकूण रुग्ण संख्या १८२४९० झाली. आता पाचव्यांदा लॉकडाउन वाढविला जात आहे. लॉकडाउनबद्दल सरकारचे धोरण काय, कोरोनाशी लढाईची नेमकी रणनिती काय, आर्थिक अरिष्टातून कसे बाहेर पडणार, याची उत्तरे सरकारने द्यावी, अशी मागणी सुरजेवाला यांनी केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress criticizes Modi Government