esakal | काँग्रेसला नवा अध्यक्ष कधी आणि कोण? काय घडलं CWCच्या बैठकीत
sakal

बोलून बातमी शोधा

congress cwc congress president

काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक आज पार पडली. यामध्ये पक्षाच्या अध्यक्ष निवडीबाबत चर्चा झाली. 

काँग्रेसला नवा अध्यक्ष कधी आणि कोण? काय घडलं CWCच्या बैठकीत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक आज पार पडली. यामध्ये पक्षाच्या अध्यक्ष निवडीबाबत चर्चा झाली. शुक्रवारी झालेल्या या बैठकीत काही नेत्यांमध्ये तू तू मै मै देखील झालं. अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. 

सध्या सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष आहेत. आता नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया आणखी पुढे ढकलण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे सचिव केसी वेणुगोपाल यांनी सांगितलं की, कार्यकारी समितीने काँग्रेस अध्यक्ष जूनमध्ये निवडण्याचे ठरवले आहे. याशिवाय बैठकीत शेतकरी आंदोलनावरून चर्चा होत आहे. तसंच अर्णब गोस्वामी चॅट लीक प्रकरणावरूनही चर्चा झाली.

काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत शेतकरी आंदोलन प्रकरणी एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यासोबतच व्हॉटसअॅप चीट लीकच्या जेपीसी चौकशीबाबतही प्रस्ताव मंजूर केला गेला. बैठकीवेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. 

हे वाचा - ममतादीदींना धक्क्यावर धक्के; आणखी एका कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा

सोनिया गांधी म्हणाल्या की, शेतकऱ्यांचा मुद्द्यांवर सरकार अंहकारी आणि असंवेदनशील असल्याचं दिसत आहे. नव्या कृषी कायद्याला घाई घाईत लागू करण्यात आलं आहे. यावर संसदेत योग्य पद्धतीने चर्चा झाली नाही असंही त्यांनी म्हटलं