Mallikarjun Kharge: नुकसान भरपाईचा कालावधी वाढवा: मल्लिकार्जुन खर्गे
GST Changes: काँग्रेसने जीएसटी सुधारणा नंतर राज्यांच्या महसूल हानीकडे लक्ष वेधले. तसेच राज्यांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली.
नवी दिल्ली : वस्तु आणि सेवा करातील (जीएसटी) बदलाच्या घोषणेनंतर काँग्रेसने राज्यांच्या संभाव्य महसूल हानीकडे लक्ष वेधले आहे. तसेच राज्यांच्या नुकसान भरपाईचा कालावधी पाच वर्षांसाठी वाढविण्याची मागणी केली आहे.