काँग्रेसचे २००९ पासूनच चित्त्याकडे ‘चित्त’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress Forest Environment Minister Jairam Ramesh

काँग्रेसचे २००९ पासूनच चित्त्याकडे ‘चित्त’

नवी दिल्ली : भारतात चित्त्याच्या आगमनाचा उत्सव साजरा होत असताना त्याच्या श्रेयावरून काँग्रेसने मोदी सरकारवर हल्ला केला आहे. भारतात चित्ता आणण्याच्या प्रकल्पाचा प्रारंभ २००९ मध्ये झाला होती असा दावा काँग्रेसचे सरचिटणीस आणि तत्कालीन वन व पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी केला आहे. या संदर्भात कधीच प्रयत्न झाले नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे म्हणणे त्यांच्या खोटे बोलण्याच्या सवयीचा भाग आहे असाही टोला त्यांनी लगावला.

नामीबियातून आणलेले तीन चित्ते शनिवारी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात मोदी यांच्या हस्ते सोडण्यात आले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात मोदी यांनी मागील सरकारांवर शरसंधान केले होते. ‘सात दशकांपूर्वी देशातून लुप्त झालेल्या चित्त्यांना परत आणण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न झाले नव्हते,‘ अशी टिप्पणी त्यांनी केली होती.

त्यावर रमेश यांनी ''यूपीए‘ सरकारच्या काळात ‘प्रोजेक्ट चित्ता‘ राबविण्याबाबतचा पत्रव्यवहार ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करण्यात आला. २००९ मध्ये भारतीय वन्य पशू ट्रस्टचे एम. के. रणजित सिंह यांना रमेश यांनी पत्र लिहिले होते. चित्त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत कृती योजना तयार करण्यासाठी आणि त्यासाठीचे संभाव्य ठिकाणी निश्चित करण्यासाच्या सूचना रमेश यांनी पत्राद्वारे दिल्या होत्या.

या पत्राचा हवाला देत रमेश यांनी म्हटले आहे की, हे ते पत्र आहे ज्याद्वारे २००९ मध्ये ‘प्रोजेक्ट चित्ता‘ सुरू करण्यात आला होता. आपले पंतप्रधान सवयीने खोटे बोलतात. मी भारत जोडो यात्रेच्या कार्यक्रमांमध्ये व्यग्र असल्यामुळे शनिवारीच हे पत्र प्रसिद्ध करता आले नव्हते.

याआधीही चित्त्यांचे आगमन होण्याच्या बातम्या झळकल्यानंतर रमेश यांनी अशी योजना २००९ मध्ये झाल्याचा दावा ट्विटद्वारे केला होता. दरम्यान, रमेश यांच्या या दाव्यांवर भाजपकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.

Web Title: Congress Forest Environment Minister Jairam Ramesh Cheetah India Pm Narendra Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..