
या घटनेच्या स्मरणार्थ देशभर काँग्रेस पक्षाकडून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमांची रचना व अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय स्तरावर एक समिती स्थापन केली आहे त्याची घोषणा काँग्रेस पक्षाने केली आहे.
कऱ्हाड : भारत विरूद्ध पाकिस्तान युद्धात १९७१ साली निर्माण झालेल्या बांगलादेश मुक्ती संग्रामला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या स्मरणार्थ काँग्रेसकडून राष्ट्रीय स्तरावर उपक्रम घेतले जाणार आहेत. त्या उपक्रमांचे नियोजन, अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय स्तरावर समिती गठीत केली आहे. माजी संरक्षण मंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते ए. के. अँटनी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यासमितीत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश पक्षाने केले आहे.
भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामधील युद्धात भारताने पाकिस्तानला हरवून भारताने निर्माण केलेल्या बांगलादेशला ५० वर्षे पूर्ण होत त्या घटनेच्या स्मरणार्थ देशभर उपक्रम घेतले जाणार आहेत. यासाठी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या सूचनेवरून समिती गठीत करण्यात आली आहे.
ED कारवाईत सुसाट, मात्र गुन्हे सिद्ध करण्यात नापास; पाहा रिपोर्टकार्ड
काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या (स्व.) इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने पाकिस्तानवर विजय मिळवीत पाकिस्तानचे दोन तुकडे करीत बांगलादेशची सन १९७१ साली निर्मिती केली होती. याच घटनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. भारत विरूद्ध पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला हरवून बांगलादेशची निर्मिती करण्यात आली हा दिवस १६ डिसेंबर ला विजय दिवस म्हणून दरवर्षी देशात साजरा केला जातो. म्हणून या घटनेच्या स्मरणार्थ देशभर काँग्रेस पक्षाकडून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमांची रचना व अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय स्तरावर एक समिती स्थापन केली आहे त्याची घोषणा काँग्रेस पक्षाने केली आहे.
नाद खूळा! वेश बदलून एसपीच फिरताहेत साता-याच्या रस्त्यांवर
माजी संरक्षण मंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते ए. के. अँटनी या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, माजी संरक्षण राज्यमंत्री जितेंद्र सिंह, श्रीमती किरण चौधरी, उत्तम कुमार रेड्डी, मेजर वेद प्रकाश, श्रीमती शर्मिष्ठा मुखर्जी, कॅप्टन प्रवीण डवर यांच्यासह माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.
संपादन : सिद्धार्थ लाटकर