राज्य निवडणुकीसाठी कॉंग्रेसची छाननी समिती; ज्योतिरादित्य अध्यक्षपदी

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 22 August 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी अर्ज छाननी समिती नेमली आहे. प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षनेत्यांचा समावेश असलेली ही समिती उमेदवार ठरवेल. मात्र अद्याप राष्ट्रवादी कॉंग्रेसशी जागावाटपाची बोलणी पूर्ण झालेली नाही. 

नवी दिल्ली ः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी अर्ज छाननी समिती नेमली आहे. प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षनेत्यांचा समावेश असलेली ही समिती उमेदवार ठरवेल. मात्र अद्याप राष्ट्रवादी कॉंग्रेसशी जागावाटपाची बोलणी पूर्ण झालेली नाही. 

लोकसभा निवडणुकीदरम्यान तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधींनी उमेदवारी अर्ज छाननी समिती नेमण्याची परंपरा मोडीत काढताना प्रदेश पातळीवरूनच उमेदवारांची अंतिम यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठविण्याची नवी पद्धत सुरू केली होती. आता सोनिया गांधींनी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यासाठी छाननी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

कॉंग्रेसच्या उमेदवारी अर्ज छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे असतील. पंजाबचे हरिश चौधरी आणि तमिळनाडूतील खासदार माणिकम टागोर हे सदस्य असतील. या सोबतच महाराष्ट्राचे प्रभारी सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विधिमंडळ पक्षनेते के. सी. पाडवीही या समितीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress forms screening committee for upcoming Maharashtra assembly polls