
नॅशनल हेराल्ड प्रकरणी भाजपनं काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
काँग्रेसवाले पूर्वी 'सत्याग्रह' म्हणायचे, पण आता..; संबित पात्रांची गांधी परिवारावर टीका
नॅशनल हेराल्डशी (National Herald) संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं (ED) बुधवारी सायंकाळी नवी दिल्लीतील नॅशनल हेराल्डच्या इमारतीतील यंग इंडियाचं कार्यालय सील केलं. येत्या शुक्रवारी 5 ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षानं वाढत्या महागाई आणि बेरोजगारीविरोधात पंतप्रधानांच्या निवासस्थानाला काँग्रेसनं घेराव घालण्याची तयारी केली असून, त्यावर घाबरलेल्या मोदी सरकारची (Modi Government) ही प्रतिक्रिया असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय.
दरम्यान, याबाबत आज भाजपनं काँग्रेस (Congress) आणि गांधी परिवाराला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) म्हणाले, 'काँग्रेसचे नेते म्हणत आहेत की, आता रण होणार आहे. पूर्वी सत्याग्रह होईल असं म्हणायचे; पण आता 'रण'बाबत बोलत आहेत. परंतु, आता कोणतंही रण होणार नाही, अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केलीय.
हेही वाचा: केरळचे पत्रकार सिद्दीकी कप्पन यांना मोठा धक्का; जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार
ईडीच्या अधिकाऱ्यांनी काल सायंकाळी आयटीओ येथील हेराल्ड हाऊसच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या यंग इंडियाचे कार्यालय सील केलं. पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी हे कार्यालय सील करण्यात आल्याचं ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र, नॅशनल हेराल्डचं कार्यालय सील करण्यात आलेलं नसल्याचं रात्री एका ट्वीटद्वारे नॅशनल हेराल्ड व्यवस्थापनानं स्पष्ट केलं. लवकरच २४, अकबर रोड येथील काँग्रेस मुख्यालयावरही ईडी छापा घालणार असल्याचं वृत्त पसरलं. अकबर रोडवर मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात करून हा रस्ता बंद करण्यात आल्यामुळं या चर्चेला उधाण आलंय.
हेही वाचा: न्यायमूर्ती ललित बनणार देशाचे नवे सरन्यायाधीश; रमना यांनी केंद्राकडं पाठवली शिफारस
कर्नाटकहून दिल्लीला परतणारे राहुल गांधी यांनाही नॅशनल हेराल्ड प्रकरणी अटक करण्यात येईल, अशीही चर्चा सुरू होती. यंग इंडियाचे कार्यालय सील केले जात असताना सोनिया गांधी यांच्या १०, जनपथ निवासस्थानासमोर प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यंग इंडियाचे कार्यालय सील केल्याचे वृत्त ऐकून राहुल गांधी आपला दोन दिवसांचा कर्नाटक दौरा अर्धवट सोडून रात्री अकरा वाजता दिल्लीला परतले. त्यांचे निवासस्थान असलेल्या तुघलक लेन भागातही पोलिस बंदोबस्त होता. नॅशनल हेराल्डवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसजनांनी आक्रमक होऊ नये म्हणून हा पोलिस बंदोबस्त लावण्यात आल्याचं म्हटलं जात होतं.
Web Title: Congress Furious Over Sealing The National Herald Office Bjp Did Counter Attack Sambit Patra
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..