Adani-Hindenburg Case : अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात काँग्रेसची उडी; RBI-SEBI द्वारे चौकशीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi, Jairam Ramesh and Gautam Adani

Adani-Hindenburg Case : अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात काँग्रेसची उडी; RBI-SEBI द्वारे चौकशीची मागणी

नवी दिल्ली - यूएसस्थित हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समूहाने शेअर्सची हेराफेरी केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच शेअर्सच्या मूल्यांकनापासून कॉर्पोरेट गव्हर्नन्सपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशीही घसरले. त्यातच आता हिंडनबर्गच्या अहवालावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रमेश यांनी अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. या आरोपांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) सारख्या संस्थांकडून गंभीरपणे चौकशी करणे आवश्यक आहे जे भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थिरता आणि सुरक्षिततेसाठी जबाबदार आहेत.

काँग्रेस नेते म्हणाले, 'अदानी समूह आणि सध्याचे सरकार यांच्यातील घनिष्ठ संबंध सर्वांना ठावूक आहे. परंतु SEBI आणि RBI यांना आर्थिक व्यवस्थेचे कारभारी म्हणून त्यांची भूमिका बजावण्याची आणि व्यापक सार्वजनिक हितासाठी या आरोपांची चौकशी करण्याची विनंती करणे ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे.

आर्थिक विषमेतेमुळे भारताची लोकशाही धोक्यात आली आहे. दुसरं म्हणजे आरएसएस आणि भाजपची विचारधारा विभाजनकारी आहे. सामाजिक धृवीकरण त्यांची रणनिती आहे. निवडणुकांमध्ये फायद्यासाठी जाती-धर्म-भाषा आणि प्रांतवादावर धृवीकरण करण्यात येत. त्यामुळे देश कमकुवत होते, असंही रमेश यांनी म्हटलं.

टॅग्स :Share Marketrbisebi