
Sharad Pawar : शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीनंतर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे निमित्त साधत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. सध्याच्या राजकारणातील वाईट आणि परंपरा, चाली सुरू झाल्या आहेत. त्यावर आघात करून मोडून, तोडून टाकण्यासाठी एकत्र आलो आहोत असं उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
त्यानंतर प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेत म्हणाले की, आमची युती फक्त शिवसेनेच्या ठाकरे गटाशी आहे. महाविकास आघाडीशी आमची युती नाही. त्यानंतर आज शिवशक्ती भीमशक्ती यांच्या युतीवर शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समाविष्ट होण्यासाठी अद्याप प्रस्ताव आलेला नाही. त्याचबरोबर आमची अजून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीत असण्याचा नसण्याची काहीच हरकत नाही . तर जागावाटपाचीही चर्चा इतक्यात नाही असंही शरद पवार यांनी म्हंटलं आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना अजून महाविकास आघाडीत समाविष्ट होण्यासाठीचा प्रस्ताव आलेला नाही. यासंबधी आमची प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली नाही असं शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे निमित्त साधत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करण्यात आली. प्रथम देशहित महत्त्वाचं असतं. कारण एक भ्रम पसरवला जातोय. नेहमी हुकूमशाहीकडे वाटचाल ही अशीच होते. जनतेला भ्रमात ठेवायचं. नको त्या वादात आडकवून ठेवायचं आणि आपलं इप्सित साध्य करायचं असं चाललंय. या वैचारीक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास मिळवून देण्यासाठी आणि देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, आणि घटनेचं महत्त्व आणि त्याचं पावित्र आबाधित राखण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी वंचित आघाडीसोबतची युतीची घोषणा केली.