दहा दिवसांत नव्या पक्षाची घोषणा करणार, आझाद यांनी केलं जाहीर

Ghulam Nabi Azad
Ghulam Nabi Azadesakal
Updated on

Ghulam Nabi Azad New Party : काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी आज जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी येत्या 10 दिवसांत नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या तीन वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये अनेक आपत्तीजनक घटना घडल्या असून भारतीय इतिहासाप्रमाणेच काश्मीरही आक्रमकांनी उद्ध्वस्त केले असल्याचे आझाद म्हणाले.

पुढे बोलताना गुलाब नबी आझाद म्हणाले की, मुघलांनी 800 वर्षे राज्य केले आणि ब्रिटिशांनी 300 वर्षे राज्य केले, परंतु जम्मू-काश्मीरमध्ये हजारो राज्यकर्ते आणि आक्रमणकर्ते झाले आहेत. जम्मू-काश्मीरला सर्वांनी लुटले आणि स्वातंत्र्यानंतर ते अंतर्गत राजकारणाचे बळी ठरले असे त्यांनी सांगितले. दरम्यान आझाद यांनी तीन दिवसांपासून 300 हून अधिक शिष्टमंडळांची भेट घेतली आहे. शनिवारी सकाळी ते दोडा येथे पोहोचल्यावर त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. डोडामध्ये त्यांनी जम्मूच्या लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवणार असल्याची ग्वाही दिली. जम्मू-काश्मीरमधील जनतेवर अन्याय होत असून त्याविरोधात आवाज उठवला जाईल, असे ते म्हणाले.

Ghulam Nabi Azad
गोळीबार केल्याचा आरोपांवर सदा सरवणकरांची प्रतिक्रिया, म्हणाले..

शुक्रवारी किश्तवाडमधील रॅलीदरम्यान त्यांनी आपल्या प्रस्तावित नव्या पक्षाचा अजेंडा सर्वांसमोर ठेवला. आपण नवा पक्ष काढणार असून जम्मू-काश्मीरमधील भागात जाऊन लोकांचे मत जाणून घेणार असून, लोकांच्या समस्या ऐकणार असल्याचे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. तसेच जनतेशी चर्चा करूनच पक्षाचे नाव ठेवले जाईल, असे ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करणे आणि स्थानिक लोकांच्या नोकरी आणि जमिनीच्या अधिकारांचे संरक्षण करणे या नवीन पक्षाच्या अजेंडाच्या संदर्भात परिस्थिती स्पष्ट आहे, असे ते म्हणाले.

Ghulam Nabi Azad
शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन, वयाच्या ९९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com