गोळीबार केल्याचा आरोपांवर सदा सरवणकरांची प्रतिक्रिया, म्हणाले..

 MLA Sada Saravankar on shivsena eknath shinde group mumbai prabhadevi
MLA Sada Saravankar on shivsena eknath shinde group mumbai prabhadevi esakal
Updated on

मुंबई : गणपती विसर्जनाच्या वेळी शिंदे गट आणि ठाकरे गट समोरासमोर आल्याचा प्रकार समोर आला होता, मुंबईतल्या प्रभादेवी भागात मध्यरात्री दोन्ही गट भिडले, यामध्ये दोन्ही गटात हाणामारी झाली. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचाही आरोप करण्यात आला, दरम्यान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी माध्यमांसोमोर येत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

गणपती विसर्जन मिरवणूकीच्या वेळी सुरुवातीपासून वेगळ्याप्रकारचे हावभाव करणं सुरु होतं, हा उत्वस आनंदात आणि उत्साहात साजरा व्हायला पाहिजे होते, एकमेकांना डिवचण्याचे प्रकार जे झाले ते व्हायला नको होते. मी तेथे आल्यावर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी अकरा वाजता सांगितल्यावर मी आमच्यासोबतच्या महिलांना घेऊन निघून आलो, असे सरवणकर म्हणाले. त्यानंतर काल रात्री बारा वाजता संतोष तेलवणे याच्यावर हल्ला केल्याची बातमी मिळाल्यावर मी घटनास्थळी गेलो आणि त्यानंतर पोलिस स्टेशनला गेलो, असे सरवणकर म्हणाले. कारण हे होतं, स्वागत कक्षाजवळ एकमेकांना डिवचण्याचे प्रकार झाले, तो राग मनात ठेवून हा हल्ला झाला असे सरवणकर यांनी सांगितले.

 MLA Sada Saravankar on shivsena eknath shinde group mumbai prabhadevi
Shivsena Mumbai: मुंबईत सेना- शिंदे गट भिडले; सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप

सरवणकर पुढे बोलताना म्हणाले की, सोशल मिडीयावर एकमेकांना तिथंच उत्तरं देतात, घरी जाऊन मारामारी करणं दुर्दैवी आहे असेही ते म्हणाले. गोळीबार केल्याच्या आरोपांना उत्तर देताना सरवणकर म्हणाले की, मी या भागातील आमदार आहे, मी शिंदे यांच्यासोबत काम करतोय त्यामुळे मला बदनाम करण्यासाठी ही रणनीती आखली जातेय, मी कामाने मोठा झालेला आमदार आहे, भांडणं करून मोठा झालेलो नाही, असे सरवणकर म्हणाले. लायसन्सच पिस्तुल माझ्याजवळ आहे पण स्टेनगन असलेली पोलिस फौज असताना मला अशा प्रकारची काय गरज आहे.

दरम्यान बंदूक हातात घेतलेला व्हिडीओ व्हायरल होतोय त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की मला खरं वाटत नाही, सोशल मिडीया हा माझ्यासाठी आज्ञानाचा भाग आहे. मी तशा प्रकारचा कोणताही गुन्हा केला नाही. मात्र पोलिसांवर दबाव आणून कोणी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत असतील तर पोलिस त्यांचं काम करतील असे सरवणकर म्हणाले.

 MLA Sada Saravankar on shivsena eknath shinde group mumbai prabhadevi
दुपारी झोपायची चूक तुम्हीही करता का? आताच थांबवा नाहीतर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com