Karnataka : मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार? 50 आमदार दिल्लीत तळ ठोकून, हेब्‍बाळकरांसह 18 जण शर्यतीत

मंत्र्यांची यादी जवळपास निश्चित होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
DK Shivakumar Siddaramaiah
DK Shivakumar Siddaramaiahesakal
Summary

लोकसभा निवडणूक (LokSabha Election) समोर ठेवून मंत्र्यांची यादी अंतिम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्येष्ठ आमदारांना डावलण्याचा निर्णय घेतला आहे.

बंगळूर : काँग्रेस सरकारच्या (Congress Government) मंत्रिमंडळ विस्ताराचे दिल्लीत लॉबिंग सुरू असून, आमदार लक्ष्मी हेब्बाळकरांसह १८ मंत्र्यांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. तेथे ५० हून अधिक आमदार तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार मंत्रिमंडळ विस्तार आणि खात्यांच्या वाटपावर दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत.

मुख्यमंत्री (Siddaramaiah) आणि उपमुख्यमंत्री (D. K. Shivakumar) बुधवारी संध्याकाळी दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याशी दोन तास चर्चा केली. मंत्र्यांची यादी जवळपास निश्चित होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, या यादीशिवाय दोन नावे घेण्यात आली असून, त्यापैकी एकाचे नाव निवडण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तार करताना काँग्रेस हायकमांडने (Congress High Command) आठ सूत्रे राबवून मंत्रिपद दिले जात आहे.

DK Shivakumar Siddaramaiah
Balasaheb Patil : पडळकर, दरेकर, खोतांची लोकप्रियतेसाठीच शरद पवारांवर टीका; आमदार पाटलांचा घणाघात

लोकसभा निवडणूक (LokSabha Election) समोर ठेवून मंत्र्यांची यादी अंतिम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्येष्ठ आमदारांना डावलण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील विधानसभा निवडणूक लढवली नाही, तरी काँग्रेसचे मोठे नुकसान होणार नाही. त्यासाठी हायकमांडने ज्येष्ठ आमदारांना मंत्रिपद मिळणार नसल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, दिल्लीत सिद्धरामय्या आणि शिवकुमार हे दोघेही मंत्रीमंडळात आपल्या निष्ठावंतांची नावे पुढे करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

DK Shivakumar Siddaramaiah
Parbhani : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचं 'मविआ'समोर थेट आव्हान; वादाची 'ती' ठिणगी वणवा पेटवणार?

परिणामी खात्यांच्या वाटपात विलंब होत आहे. मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त ३४ मंत्री असू शकतात. आमदार लक्ष्मण सवदी, कृष्णा बैरेगौडा, दिनेश गुंडूराव आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांची भेट घेतली.

शपथविधीपूर्वी सिद्धरामय्या यांनी विधान परिषदेचे नेते बी. के. हरिप्रसाद आणि शांतिनगरचे आमदार एन. ए. हॅरिस यांचा मंत्रिमंडळात समावेशावर नकार दिला. तर कृष्णा बैरेगौडा, दिनेश गुंडूराव, जमीर अहमद खान, एच. सी. महादेवाप्पा आणि एम. बी. पाटील यांच्या समावेशावर शिवकुमार यांनी आक्षेप घेतला.

मंत्रिपदासाठी अष्ट सूत्रे अशी

  • विधान परिषदेतून एकच मंत्री.

  • लिंगायत समाजासाठी अधिक मंत्रिपदे.

  • लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागासवर्गीयांसाठी लॉटरी.

  • ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून वगळणार.

  • मंत्रिमंडळात एकच महिला आमदार.

  • वक्कलिग समाजातील तरुण आमदारांना संधी

  • गंभीर आरोप असलेल्या आमदारांना मंत्रिपद नाही

  • संघर्षात उदासीनता दाखवणाऱ्यांना मंत्रिपद नाही

DK Shivakumar Siddaramaiah
Koregaon Employees Strike : आमदार महेश शिंदेंची शिष्टाई असफल; राष्ट्रवादीच्या नेत्याचा 'त्यांना' पाठिंबा!

संभाव्य मंत्री

लक्ष्मी हेब्बाळकर, ईश्वर खांड्रे, शिवानंद पाटील-दर्शनपूर, बसवराज रायरेड्डी, डॉ. महादेवप्पा, पेरियापट्टण व्यंकटेश, एस. एस. मल्लिकार्जुन, बैराती सुरेश, कृष्णा बैरेगौडा, रहिम खान, अजय सिंग, पुट्टरंग शेट्टी, नरेंद्र स्वामी, चिंतामणी सुधाकर, हिरीयुर सुधाकर, एच. के. पाटील, चेलुवरायस्वामी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com