हिमाचलमध्ये काँग्रेसला धक्का; अरुण शर्मा यांचा आम आदमी पक्षात प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अरुण शर्मा यांचा आम आदमी पक्षात प्रवेश
हिमाचलमध्ये काँग्रेसला धक्का; अरुण शर्मा यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

हिमाचलमध्ये काँग्रेसला धक्का; अरुण शर्मा यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

नवी दिल्ली : गुजरातप्रमाणेच हिमाचल प्रदेशातही काँग्रेसला धक्का बसला आहे. सरचिटणीस अरुण शर्मा यांनी आम आदमी पक्षात (आप) प्रवेश केला. आणखी काही नेते काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा दावा त्यांनी केला आहे. काँग्रेसच्या हिमाचलमधील शाखेला गटबाजीने ग्रासल्याचा आणि त्यामुळे अनेक नेते निराश झाल्याचा दावा करीत शर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षात प्रवेश केला.

येथील आप मुख्यालयात त्यांनी पत्रकार परिषदेत पुढे सांगितले की, जेथे चार चालक वाहन चालवितात तेव्हा ते चार दिशांना भरकटते आणि मग अपघात होणे अटळ असते. तुम्ही पक्ष चालविण्याच्या बाबतीत असे करू शकत नाही. त्यामुळे गटबाजी सुरु झाली आहे. गट तयार करण्यासाठी प्रत्येक जण कुरघोडी करत आहे. प्रत्यक्षात पक्षाला काहीही फायदा होत नाही. त्यामुळे नुकसान होत आहे. याप्रसंगी इंटकचे कुलू जिल्हा सरचिटणीस संजय शर्मा यांनीही आपमध्ये प्रवेश केला. दिल्लीचे आरोग्य मंत्री आणि प्रभारी सत्येंदर जैन यांनी त्यांचे आपमध्ये स्वागत केले.

केजरीवाल यांच्या धोरणांमुळे हिमाचलमध्येच नव्हे तर देशात बदल घडत आहेत. आगामी निवडणुकांत जनमताचा कौल मिळेल आणि हा पक्ष सरकार स्थापन करेल.

- अरुण शर्मा, हिमाचलचे नेते

हिमाचलची जनता भाजप आणि काँग्रेसला कंटाळली आहे. आपला जनमत देण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.

- सत्येंदर जैन, आपचे प्रभारी

Web Title: Congress In Himachal Pradesh Arun Sharma Joins Aam Aadmi Party

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top