‘काँग्रेस म्हणजे भाजपकडे माणसे पाठवण्याची सिस्टीम', मुख्यमंत्र्याचा टोला

काँग्रेस पक्ष हा अशी एक यंत्रणा (सिस्टीम) बनत आहे, जी भाजपकडे माणसे पाठवते, अशा शब्दांत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी टीका केली.
pinarayi vijayan
pinarayi vijayanSakal
Summary

काँग्रेस पक्ष हा अशी एक यंत्रणा (सिस्टीम) बनत आहे, जी भाजपकडे माणसे पाठवते, अशा शब्दांत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी टीका केली.

कोची - काँग्रेस पक्ष हा अशी एक यंत्रणा (सिस्टीम) बनत आहे, जी भाजपकडे माणसे पाठवते, अशा शब्दांत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी टीका केली. त्रिक्काकारा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी त्यांनी जाहीर सभा घेतली. भाषणात ते म्हणाले की, एकूणच काँग्रेस हा पक्ष म्हणून कोसळत आहे. देशभरात काँग्रेसला मोठे धक्के बसत आहेत.

सुनील जाखड आणि हार्दिक पटेल यांनी नुकतीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. याचा उल्लेख करून विजयन म्हणाले की, काँग्रेसचा भाग असलेले अनेक नेते भाजपमध्ये जाऊन केंद्रीय मंत्री, खासदार झाले आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचा भाग असलेल्या पक्षांना याची चिंता वाटत आहे.

पंजाबचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या अटकेचाही त्यांनी उल्लेख केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com