"काँग्रेस भारतातून नष्ट होतेय अन् जगातून कम्युनिस्ट"; अमित शहांचा हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah

"काँग्रेस भारतातून नष्ट होतेय अन् जगातून कम्युनिस्ट"; अमित शहांचा हल्लाबोल

थिरुवअनंतपुरम : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी कधीही गरिबांसाठी काम केलं नाही. तसेच काँग्रेस भारतातून संपतेय, अशा शब्दांत शहा यांनी म्हटलं आहे. (Congress is vanishing from India and communists from world Amit Shah)

केरळमधील थिरुवअनंतपुरम इथं भाजपच्या अनुसुचित जाती-जमाती परिषदेत शहा बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपनं SC-ST समाजासाठी केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीवर टीका करताना त्यांनी केवळ या समाजांचा व्होट बँक म्हणूनच वापर केल्याचा आरोप केला.

हेही वाचा: Sonali Phogat : प्रॉपर्टी अन् आरोपी! हत्या प्रकरणात नवा खुलासा

शहा म्हणाले, देशातून काँग्रेस संपत चालली आहे. तर जग कम्युनिस्ट पार्टीपासून मुक्त होत आहे. जर केरळला भविष्य असेल तर ते केवळ भाजपसोबतच आहे. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीनं कधीही अनुसुचित जमाती आणि गरीबांसाठी काम केलं नाही, त्यांनी यांना केवळ व्होट बँक असंच समजलं.

Web Title: Congress Is Vanishing From India And Communists From World Amit Shah

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..