Karnataka : सिद्धरामय्यांमुळंच युती सरकार कोसळलं; सत्ता स्थापन करण्यापूर्वीच दोन बड्या नेत्यांचा मोठा गौप्यस्फोट

युती सरकार पडण्यामागे केवळ सिद्धरामय्याच कारणीभूत असल्याचा गौप्यस्फोटही त्या दोघांनी केला आहे.
Congress Leader Siddaramaiah
Congress Leader Siddaramaiahesakal
Summary

सध्या दिल्लीत सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदासाठी हायकमांडकडे जोरदार प्रयत्न करत असतानाच या दोघांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बंगळूर : काँग्रेस-धजद युती सरकारच्या (Congress-JDS Government) काळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनीच आम्हाला काँग्रेस सोडण्यास प्रवृत्त केले, असा गंभीर आरोप माजी मंत्री एस. टी. सोमशेखर आणि डॉ. के. सुधाकर यांनी केला.

युती सरकार पडण्यामागे केवळ सिद्धरामय्याच कारणीभूत असल्याचा गौप्यस्फोटही त्या दोघांनी केला आहे. डॉ. सुधाकर यांनी ट्विटरवर थेट सिद्धरामय्या यांच्यावर आरोप केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर एक दिवसही युतीचे सरकार राहू देणार नाही, असे सिध्दरामय्या यांनी आमदारांना सांगितले होते.

Congress Leader Siddaramaiah
Maharashtra Politics : आमच्या घराण्यात विश्‍वासघात करण्याची परंपरा नाही; उदयनराजेंचा शरद पवारांवर थेट वार

सध्या दिल्लीत सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदासाठी हायकमांडकडे जोरदार प्रयत्न करत असतानाच या दोघांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सिद्धरामय्या यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी या दोघांनी राजकीय फासे टाकले असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

ट्विटमध्ये काय आहे?

सोमशेखर यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, युती सरकारच्या काळात सिद्धरामय्या समन्वय समितीचे अध्यक्ष होते. त्यांनीच आम्हाला पक्ष सोडण्यास प्रवृत्त केले. युती सरकारमध्ये पक्ष सोडण्याची अप्रत्यक्ष प्रेरणा सिद्धरामय्या यांची होती. हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.

Congress Leader Siddaramaiah
Karnataka Result : बंडखोरीमुळं काँग्रेसनं गमावल्या 'इतक्या' जागा; फेरमतमोजणीत उमेदवाराचा 16 मतांनी पराभव

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले सुधाकर ट्विटमध्ये म्हणाले की, युती सरकारच्या काळात पक्ष सोडण्याची सिद्धरामय्या यांची प्रेरणा अप्रत्यक्ष किंवा गुप्त हेतू नव्हती. धजद-काँग्रेस युती सरकारच्या काळात २०१८ मध्ये आमच्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार करण्यासाठी आम्ही समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या यांच्याकडे गेलो. `तेव्हा या सरकारमध्ये काहीही घडत नाही. माझ्या मतदारसंघातील कामे होत नाहीत, असे म्हणत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सहन करा. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील हे आघाडी सरकार लोकसभा निवडणुकीनंतर एक दिवसही राहू देणार नाही’, अशी ग्वाही सिद्धरामय्या आमदारांना दिली होती, असे सुधाकर यांनी ट्विट केलंय.

Congress Leader Siddaramaiah
Deepak Pawar : भाजप आमदार शिवेंद्रराजेंना पाडूनच मी रिटायरमेंट घेणार; राष्ट्रवादीच्या पवारांचा थेट इशारा

काँग्रेस सोडण्यास सिद्धरामय्यांनी सांगितले होते, तर आजवर सुधाकर व सोमशेखर गप्प का होते, असा सवाल करून त्यांना आताच कशी जाग आली, असा प्रश्न एम. टी. बी. नागराज यांनी केला आहे. सिद्धरामय्या यांच्या मार्गात अडथळा आणण्याचा सोमशेखर आणि सुधाकर हे दोघे प्रयत्न करीत असल्याचा नागराज यांनी आरोप केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com