गांधी कुटुंबाच्या सुरक्षा प्रश्नावरून काँग्रेस संसदेत आक्रमक

वृत्तसेवा
Monday, 18 November 2019

संसदेच्या हिवाळी अधिवेशनला सुरूवात झाली असून काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी यांनी काश्मीर मुद्यावरून आणि गांधी कुटुंबाच्या सुरक्षा प्रश्नावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनला सुरूवात झाली असून काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी यांनी काश्मीर मुद्यावरून आणि गांधी कुटुंबाच्या सुरक्षा प्रश्नावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

चौधरी म्हणाले की, 108 दिवसांपासून फारूक अब्दुल्ला यांना ताब्यात घेतलेले आहे. ही कोणती जुलुमशाही आहे? संसदेत उपस्थित राहणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना संसदेत आणावे, अशी आमची मागणी आहे. तसेच, चौधरी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका यांच्या सुरक्षेचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करत त्यांचे एसपीजी सुरक्षा कवच काढण्यात आले हा मुद्दाही त्यांनी मांडला.

मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या 'या' नेत्याची निवड

त्यानंतर विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली. विपक्ष पर हमला बंद करो, फारूक अब्दुल्ला जी को रिहा करो… अशा घोषणा देत त्यांनी सभागृह दणाणून सोडले. तसेच, न्याय द्या, न्याय द्या.. अशा घोषाणांनीही संसद दणाणून गेली होती.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके मांडली जाणारी आहेत. त्यात व्यक्तिगत माहिती संरक्षण, इलेक्ट्रिक सिगरेट प्रतिबंध, औद्योगिक क्षेत्राशी निगडित संहिता, तृतीयपंथीयांचे हक्क व संरक्षण, कर दुरुस्ती विधेयक, कंपनी दुरुस्ती विधेयक, चिट फंड दुरुस्ती विधेयक, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग, सरोगसी नियंत्रण विधेयक, जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक दुरुस्ती विधेयक या काही विधेयकांचा समावेश होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Adhir Ranjan Chowdhury slams govt in Loksabha