esakal | काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींवर भ्याड हल्ला; दिल्लीत घरात घुसून मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

ते प्रकरण आता शांत होतंय न होतंय तोच आणखी एका काँग्रेस नेत्यावर हल्ला झाल्यानं सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींवर भ्याड हल्ला; दिल्लीत घरात घुसून मारहाण

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सध्या संसदेत विरोधकांचा आवाज बुलंद करणाऱ्या काही मोजक्या नेत्यांपैकी एक असलेले काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. मंगळवारी (ता.३) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

- तब्ब्ल 'इतक्या' लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा झाली 4 हजार 807 कोटींची रक्कम...

लोकसभेत सत्ताधारी भाजप पक्षाला वारंवार तोंडावर पाडण्याचे काम अधीर रंजन यांनी अनेकदा केले आहे. कधी कधी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांना टीकेचा सामनाही करावा लागला आहे. मध्यंतरी अर्थव्यवस्था कोलमडल्याचे प्रकरण संसदेत बरेच गाजले होते. त्यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना अधीर रंजन यांनी निर्बला म्हटल्याने संसदेत बराच गदारोळ माजला होता. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आज दिल्ली हिंसाचाराच्या मुद्यावरून संसदेतील कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आले होते. त्यामुळे अधीर रंजन त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले. काही वेळातच त्यांच्या घरात काही अज्ञात हल्लेखोर घुसले. आणि अधीर रंजन यांना या हल्लेखोरांनी मारहाण केली. घरातील कर्मचाऱ्यांनीही हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांनाही धक्काबुक्की केली. याबाबतची माहिती अधीर रंजन यांनी 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. 

- फडणवीसांना दणका; सर्वोच्च न्यायालयात खटला चालणार

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची एसपीजी सुरक्षा केंद्र सरकारने काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रियांका यांच्या घरात एक चारचाकी वाहनही घुसवण्यात आले होते. यावरून बराच गोंधळ उडाला होता. ते प्रकरण आता शांत होतंय न होतंय तोच आणखी एका काँग्रेस नेत्यावर हल्ला झाल्यानं सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

- Coronavirus : आग्र्यातील ६ जण कोरोनाच्या विळख्यात; रुग्णांची संख्या वाढतेय!

अधीर रंजन चौधरी यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केल्यामुळे बुधवारी (ता.४) याचे पडसाद संसदेत उमटल्याशिवाय राहणार नाहीत. तसेच काँग्रेस नेत्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून उद्याचा दिवस वादळी ठरणार हे नक्की!