esakal | Coronavirus : आग्र्यातील ६ जण कोरोनाच्या विळख्यात; रुग्णांची संख्या वाढतेय!
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

जर्मनी, सौदी अरेबिया, फ्रान्स, रशिया, इंडोनेशिया आणि ब्रिटनसह जगभरातील ६० देशांमध्ये कोरोनाने हजेरी लावली आहे.

Coronavirus : आग्र्यातील ६ जण कोरोनाच्या विळख्यात; रुग्णांची संख्या वाढतेय!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चीनमध्ये थैमान घातल्यानंतर जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाने आपले पाय रोवण्यास सुरवात केली आहे. शेजारी राष्ट्र असलेल्या भारतातही कोरोनाने एन्ट्री घेतली असून भारतीयांना हळूहळू आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरवात केली आहे.

- Photos : कोरोना चीनला 'लाभदायी'; नासाने केले फोटो शेअर!

उत्तर प्रदेशातील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या आग्र्याला कोरोनाने आपले लक्ष्य बनवले आहे. आग्र्यातील सहा जणांना कोरोनाही लागण झाल्याचं सॅम्पल टेस्टमधून पुढे आलं आहे. दिल्लीतील कोरोना व्हायरसने ग्रासलेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे या सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. कोरोनाला वेळीच आटोक्यात आणण्यासाठी दिल्ली सरकारने मंगळवारी (ता.३) तातडीची बैठक बोलावली  होती. 

- Coronavirus : राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र; म्हणाले...

दरम्यान, दुबईहून तेलंगणमध्ये आणि सिंगापूरहून दिल्लीत दाखल झालेल्या दोन भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचे मेडिकल रिपोर्टमधून निष्पन्न झाले होते. दुसरीकडे राजस्थानमध्ये आलेल्या इटालियन पर्यटकालाही कोरोनाची लागण झाली होती. या तिघांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. 

यापूर्वी केरळमधील तिघांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच शेजारील राष्ट्र श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तानमध्येही कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. कोरोनाग्रस्तांना एकांतवासात किंवा रुग्णालयातच ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चीन, इटली, सिंगापूर, दक्षिण कोरिया, इराण या देशांमध्ये भारतीयांनी जाऊ नये, अशी विनंती केली होती.  

- निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा रखडण्यावरून ऋषी कपूर यांनी केलं 'असं' ट्वीट..लोकांनी केली स्तुती

जगभरातील तीन हजारांहून अधिक नागरिक कोरोनाच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. यापैकी सर्वाधिक चीनमध्ये २९१२ नागरिक मृत्यूमुखी पडले असून इतर देशांमधील १५७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

कोरोनाने आतापर्यंत ९० हजारांहून अधिकांना आपले लक्ष्य बनविले. विविध देशांतील कोरोना बळींची संख्या पुढीलप्रमाणे :-
इराण - ६६
दक्षिण कोरिया - २८
अमेरिका - २

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जर्मनी, सौदी अरेबिया, फ्रान्स, रशिया, इंडोनेशिया आणि ब्रिटनसह जगभरातील ६० देशांमध्ये कोरोनाने हजेरी लावली आहे. त्यामुळे या सर्व देशांतील सार्वजनिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा काही काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत.

loading image