esakal | सावरकरांना इंग्रजांकडून प्रतिमाह ६० रुपये कशाचे मिळायचे? काँग्रेस नेत्याचा प्रश्न
sakal

बोलून बातमी शोधा

congress leader archana dalmia tweet about britishers gave pension to savarkar in 1924

काँग्रेस (Congress) नेत्या अर्चना दालमिया (Archana Dalmia) यांनी एक ट्विट करत हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावकरकर (Sawarkar) यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सावरकरांना इंग्रजांकडून प्रतिमाह ६० रुपये कशाचे मिळायचे? काँग्रेस नेत्याचा प्रश्न

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेत्या अर्चना दालमिया (Archana Dalmia) यांनी एक ट्विट करत हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावकरकर (Sawarkar) यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दालमिया यांनी सावकर यांना १९२४मध्ये इंग्रजाकडून दरमाह ६० रुपये कशाचे मिळत होते? असा प्रश्न केला आहे. या आशयाचे ट्विट त्यांनी केले असून त्याला दिलेल्या उत्तरातही अनेकांनी अशाच पद्धतीचे प्रश्न केलेले दिसून येत आहेत. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या ट्विटवर प्रतिक्रिया देताना एका युजरने भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय प्रवक्ते सांबित पात्रा (Sambit Patra) यांना टॅग करत  म्हटले आहे की, सांबित पात्रा आपल्याला याविषयी माहिती असायला हवी. आपल्या वैचारिक पूर्वजांची संपूर्ण माहिती आपण ठेवणे आवश्यक असते. तुम्हाला तुमच्या त्या वैचारिक पूर्वजांवर गर्व आहे का? ज्यांना इंग्रज प्रतिमाह पगार द्यायचे. 

यासोबतच, दुसऱ्या एका ट्विटर युजरने म्हटले आहे की, भारतियांची जासूसी, महायुद्धात भारतातील युवकांना ब्रिटिश सैन्याच्या बाजूने सामील होण्यासाठी प्रेरित करण्याकरिता तसेच, काँग्रेसला कमजोर करण्याकरिता हे पैसे मिळत असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर आणखी एका युजरने देशातील क्रांतीकारी लोकांची माहिती पुरविण्यासाठीही हे पैसे दिले जायचे असा आरोप केला आहे.

दरम्यान, विनायक दामोदर सावरकर जवळपास ९ वर्षे अंदमान निकोबारच्या कारागृहात अटकेत होते. त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. सावरकरांवर नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सनच्या हत्येच्या कटात सामील असल्याचा आरोप होता. तत्कालिन ब्रिटिश सरकारने सावरकरांना दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी २५-२५ वर्षाची सजा सुनावली होती. यावेळी या कारागृहातून अटकेत असताना सावरकरांनी इंग्रजांना माफीनामा लिहला असल्याचे सांगण्यात येते. सावरकरांनी एकूण ६ वेळा हा माफीनामा लिहला असल्याचेही म्हटले जाते, असा आरोपही अनेकवेळा काँग्रेसनेत्यांकडून करण्यात आलेला आहे.

loading image
go to top