esakal | 'लव्ह जिहाद'च्या कायद्यावरुन दिग्विजय सिंह यांनी भाजपवर केला गंभीर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

congress,  digvijay singh, bjp, love jihad

दिग्विजय सिंह यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. भाजपची दुटप्पी भूमिका पाहायला मिळत आहे. लव्ह जिहाद करणाऱ्या लोकांना भाजप पक्षात विविध पदे देऊन सन्मानित करण्यात येत आहे. दुसरीकडे यासंदर्भात कठोर कायदा करण्याचा मानस दाखवून जनतेची फसवणूक केली जात आहे, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

'लव्ह जिहाद'च्या कायद्यावरुन दिग्विजय सिंह यांनी भाजपवर केला गंभीर आरोप

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

लव्ह जिहाद (Love Jihad)  मुद्यावर भाजप दुटप्पी भूमिका घेत आहे, असा आरोप काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी केलाय. एका बाजूला भाजप लव्ह जिहाद प्रकरणात कठोर  कायदे लागू करण्याची भाषा करत आहे.  दुसरीकडे असा प्रकार करणाऱ्यांना पक्षात प्रवेश ही दिला जात आहे. या मुद्यावरुन भाजप जनेतेची दिशाभूल करत आहे, असेही दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

जबाबदारी स्वीकारणारेच यशस्वी ठरतात; पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना मूलमंत्र

दिग्विजय सिंह यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. भाजपची दुटप्पी भूमिका पाहायला मिळत आहे. लव्ह जिहाद करणाऱ्या लोकांना भाजप पक्षात विविध पदे देऊन सन्मानित करण्यात येत आहे. दुसरीकडे यासंदर्भात कठोर कायदा करण्याचा मानस दाखवून जनतेची फसवणूक केली जात आहे, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. आपल्या ट्विटसोबत दिग्विजय सिंह यांनी  आचार्य प्रमोद यांचे ट्विटही शेअर केल आहे. संपूर्ण देशात लव्ह जिहाद विरोधात कायदा आणि देव भूमि असलेल्या उत्तराखंडमध्ये लव्ह जिहादला प्रोत्साहन, असे ट्विट करत आचार्य प्रमोद यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे.

- देशातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, उत्तराखंडमधील समाज कल्याण विभाग आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्याला 50 हजार रुपये देत आहे. विवाह हा नोंदणीकृत असावा अशी अटही घालण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार संसदेच्या आगामी सत्रात  लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणण्यच्या तयारीत आहे. यात जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांवर 5 वर्ष आणि सामूहिक धर्मांतरण करण्याच्या गुन्ह्यात 10 वर्षांच्या शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. 

यापूर्वी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देखील लव्ह जिहादच्या मुद्यावरुन भाजपवर निशाणा साधला होता. ज्या भाजप नेत्यांनी दुसऱ्या धर्मात विवाह केला आहे. त्यांच्यासाठीही लव्ह जिहादचा कायदा लागू असेल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थितीत केला होता.  केंद्र सरकार हिंदू-मुस्लिम आणि तिहेरी तलाक या मुद्यावरुन आता लव्ह जिहादकडे वळले आहे, असा घणाघात करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला होता. 

loading image