

Bullets Fired at Congress Leader's Car
Esakal
काँग्रेस नेत्याच्या गाडीवर भरदिवसा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. बिहारच्या बेगुसरायमध्ये काँग्रेस नेते गौरव कुमार यांच्या सफारी कारवर एकापाठोपाठ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गाडीवर तब्बल सात गोळ्या लागल्या. मात्र सुदैवाने गौरव कुमार यांच्यासह गाडीतील तिघेही सुरक्षित बचावले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.