
Jairam Ramesh
Sakal
नवी दिल्ली : बॅंकांच्या अधिग्रहणासाठी विदेशी कंपन्यांना परवानगी देणे अविचारीपणाचे असून भविष्यात ही बाब धोकादायक ठरू शकते, असा इशारा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला. संयुक्त अरब अमिरातीमधील (युएई) एमिरेट्स एनबीडी बॅंकेने खासगी क्षेत्रातील ‘आरबीएल’ बॅंकेचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा इशारा दिला.