esakal | केंद्र सरकार मतांसाठी अफगाणिस्तान मुद्द्याचाही वापर करेल - काँग्रेस
sakal

बोलून बातमी शोधा

Congress leader kapil sibal criticized central government

केंद्र सरकार मतांसाठी अफगाणिस्तान मुद्द्याचाही वापर करेल - काँग्रेस

sakal_logo
By
सुधीर काकडे

काँग्रेसनेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी केंद्र सरकावर टीका केली. केंद्र सरकारकडून (Central Government) उत्तर प्रदेश निवडणुकीत अफगाणिस्तान (Afghanistan) मुद्दयाचा वापर सुद्धा वापर करु शकतो अशी बोचरी टीका काँग्रेनेते कपिल सिब्बल यांनी केली आहे. इंट्रा अफगाणिस्तान संवाद कार्यक्रमात भारताने न घेतल्याने कपिल सिब्बल यांनी ही टीका केली आहे. इंट्रा अफगाणिस्तान डायलॉगमध्ये भारताची फारशी काही महत्वाची भुमिका नाही असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. अफगाणिस्तानने नुकत्याच आपल्या तालिबान सरकारची घोषणा केली. त्यानंतर जगभरातुन अफगाणिस्तानबद्दल वेगवेळ्या प्रतिक्रीया आल्या आहेत.

अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर इंट्रा अफगाणि डायलॉगमध्ये आपण फार भुमिका घेतली नाही, उलट त्या मुद्दयाचा उत्तर प्रदेश निवडणुकीत कसा वापर केला जाईल, हेच कटू सत्य आहे असे म्हणत, कपिल सिब्बल यांनी केंद्र सरकारवर टिका केली आहे. मोदी सरकारवर टिका करताना कपिल सिब्बल यांनी माध्यमांवर देखील ताशेरे ओढले आहे.

दरम्यान, संयुक्त राष्ट्र संघातील भारताचे स्थायी प्रतिनीधी टीएस तिरूमुरती यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत भारताची भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी, अफगाणिस्तानचा वापर कोणत्याही देशाला धमकी देण्यासाठी, हल्ला करण्यासाठी आणि दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी होऊ नये अशी भारताची भूमिका असल्याचे सांगितले होते. तसेच ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका मांडली. ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्ष असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल बोलताना, शांततापुर्वक पद्धतिने शांती प्रस्थापित करण्याची भूमिका मांडली आहे.

loading image
go to top