Kamalnath : कमलनाथ यांच्यानंतर काँग्रेसचा आणखी एक बडा नेता भाजपच्या संपर्कात; पक्षाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत

विरोधी पक्षांची इंडिया आघाडी तुटण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच काँग्रेसच्या आतमध्ये मोठी पडझड होताना दिसत आहे. मागच्याच आठवड्यात महाराष्ट्र काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपशी घरोबा केला होता. आता आणखी एका मोठ्या नेत्याचं नाव पुढे येत आहे.
congress sonia gandhi rahul gandhi
congress sonia gandhi rahul gandhiesakal

नवी दिल्लीः विरोधी पक्षांची इंडिया आघाडी तुटण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच काँग्रेसच्या आतमध्ये मोठी पडझड होताना दिसत आहे. मागच्याच आठवड्यात महाराष्ट्र काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपशी घरोबा केला होता. आता आणखी एका मोठ्या नेत्याचं नाव पुढे येत आहे.

मीडिया रिपोर्टमध्ये दावा करणयात येतोय की, काँग्रेस नेते आणि पंजाबच्या आनंदपूर साहिब येथील लोकसभा सदस्य मनिष तिवारी भाजपच्या संपर्कात आहेत. ते कधीही पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात. यासंबंधी कुठलीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.

congress sonia gandhi rahul gandhi
Ind vs Eng 3rd Test Day 4 : भारताने इंग्लंडचा 434 धावांनी केला पराभव, मालिकेत 2 - 1 ने घेतली आघाडी

मनिष तिवारी यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चा खऱ्या ठरल्या तर ते कधीही हाती भगवा घेऊ शकतात. हा एक काँग्रेससाठी मोठा झटका ठरु शकतो. एकीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कमलनाथ हेसुद्धा भाजपमध्ये जातील, अशी शक्यता आहे. त्यातच आता मनिष तिवारी यांचं नाव पुढे येत आहे. 'जागरण'ने हे वृत्त दिले आहे.

मनिष तिवारी यांच्या जवळच्या सूत्राने सांगितलं की, काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याचं नाव भाजपसोबत जोडणं चुकीचं आहे. मनिष तिवारी हे आपल्या मतदारसंघात लोकांची कामं करण्यात व्यस्त आहेत. त्यांच्याविषयी व्यक्त केल्या जात असलेल्या शक्यता चुकीच्या आणि निराधार आहेत.

congress sonia gandhi rahul gandhi
Prarthana Behere: पूजा सावंतच्या साखरपुड्यातील खास क्षण; प्रार्थना बेहेरेनं शेअर केला व्हिडीओ

कमलनाथ भाजपमध्ये जाणार का?

'आजतक ने दिलेल्या रिपोर्टनुसार, एका भाजप नेत्याने सांगितलं की, कमलनाथ हे १९८४ च्या शीखविरोधी दंगलीतील आरोपी आहेत. त्यांच्याविरोधात अनेक साक्षीदार आहेत. मी आठ दिवस उपोषण केल्यानंतर कमलनाथ यांच्याविरोधात एसआयटी चौकशी सुरू करण्यात आली. रकाब गंज गुरुद्वारा जाळण्यामागची व्यक्ती तीच आहे, जी ९ वे गुरु श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या स्मरणार्थ बांधली गेली होती. कमलनाथ यांना भाजपमध्ये स्थान नाही, असं भाजप नेते बग्गा यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com