काँग्रेसच्या आणखी एका नेत्याकडून मोदींचं 'कौतुक'; सरकारच्या 'या' कामावर खूश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pramod Madhwaraj

काँग्रेसचे बरेच नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं कौतुक करताना दिसत आहेत.

काँग्रेसच्या आणखी एका नेत्याकडून मोदींचं 'कौतुक'

बंगळूरु : काँग्रेसचे बरेच नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं कौतुक करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींचं कौतुक करणाऱ्या काँग्रेस नेत्यांमध्ये आणखी एक नाव जोडलं गेलंय. ते म्हणजे, कर्नाटकचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद माधवराज (Congress leader Pramod Madhwaraj) यांचं! प्रमोद माधवराज यांनी पद्म पुरस्कारांबाबतचा ट्रेंड बदलल्याबद्दल पंतप्रधानांचं तोंडभरुन कौतुक केलंय.

कर्नाटकचे माजी मंत्री माधवराज यांनी विश्वेश तीर्थ स्वामीजींना (Vishwesh Tirtha Swami) मरणोत्तर पद्मविभूषण (Padmashri Award 2021) बहाल केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केलं असून भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) केंद्रात सत्तेवर आल्यापासून पद्म पुरस्कार प्रदान करण्याच्या ट्रेंडमध्ये बदल झालाय. काँग्रेस नेत्यानं शुक्रवारी एका कार्यक्रमात भाषण देताना सांगितलं, की यापूर्वी अर्ज करणाऱ्यांना हा सन्मान दिला जात होता. मात्र, आता मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर हा ट्रेंड बदललाय. कुणी चांगलं काम केलं, तर त्याची स्तुती करायलाच हवी. मी जरी दुसऱ्या पक्षाचा (काँग्रेस) असलो, तरी पंतप्रधानांच्या चांगल्या कामाचं कौतुक मला आहे, असंही ते म्हणाले.

हेही वाचा: Big Fight : कऱ्हाड सोसायटीत काँग्रेस-राष्ट्रवादीत काट्याची टक्कर

विश्वेश तीर्थ यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी अध्यात्मिक जगतातील अतुलनीय योगदानाबद्दल उडुपीतील पेजावर मठाचे विश्वेश्व तीर्थ स्वामीजी यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात आलाय. हा पुरस्कार विश्वप्रसन्ना यांनी स्वीकारला. श्री विश्वप्रसन्ना स्वामीजींच्या स्वागतासाठी गुरुवारी उडुपीत आयोजित कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्यानं पद्म पुरस्काराबाबत मोदी सरकारचं कौतुक केलं. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर, पद्मभूषण आणि पद्मश्री सारखे पुरस्कार जे पात्र आहेत, त्यांनाच दिले जात आहेत. ते कौतुकास्पद आहे, असंही ते म्हणाले.

हेही वाचा: प्रभाकर घार्गेंची बंडखोरी राष्ट्रवादीला महागात पडणार?

loading image
go to top