देशाला पूरक अर्थसंकल्पाची आवश्यकता : पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 June 2020

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करुन अर्थसंकल्पाचा मुद्दा मांडला आहे.

सातारा ः भारतीय अर्थव्यवस्थेच्या पेचप्रसंगामुळे एक फेब्रुवारीचा अर्थसंकल्प असंबद्ध झाला आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी जूनमध्ये पूरक अर्थसंकल्प सादर करणे आवश्यक असल्याचे ट्विट काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (गुरुवार) केले आहे. 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आपल्या ट्विटमध्ये म्हणतात भारतीय अर्थव्यवस्थेच्या पेचप्रसंगामुळे एक फेब्रुवारीचा अर्थसंकल्प असंबद्ध झाले आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी जूनमध्ये पूरक अर्थसंकल्प सादर करणे आवश्यक आहे. नवीन महसूल प्रवाह, कर आकारणी आणि कर्ज घेण्याच्या योजना आणि सुधारित खर्चाच्या प्राथमिकता, विकास खर्चात कपात यांना लोकसभेने मान्यता दिली पाहिजे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Leader Prithviraj Chavan Tweets About Budget