कलम 370 हटविणे असंविधानिक : प्रियांका गांधी

वृत्तसंस्था
Tuesday, 13 August 2019

जम्मू काश्मीरातील कलम 370 हटवणे हे असंविधानिक आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी टीका केली. काश्मीर प्रकरणात प्रियांका गांधी यांनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरातील कलम 370 हटवणे हे असंविधानिक आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी टीका केली. काश्मीर प्रकरणात प्रियांका गांधी यांनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.

कलम 370 हटविल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते, की सरकारने जो निर्णय घेतला, ते संविधानाचे उल्लंघन आहे. या प्रकरणाने राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता प्रियांका गांधी यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. 

प्रियांका गांधींनी ट्विट करत सांगितले, की ईद मुबारक!, काश्मीरमधील माझ्या बहीण-भावांना भयानक त्रास सहन करावा लागत आहे. केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात पूरस्थितीचा सामना करणाऱ्या कुटुंबीयांनाही कदाचित ईदचा सण साजरा करता आला नाही.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कलम 370 मध्ये बदल केला आहे. त्या संविधानिक बदलामुळे जम्मू-काश्मीरला मिळणारा विशेष दर्जा संपुष्टात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Leader Priyanka Gandhi said about Article 370